ट्रक टँकर धडकेत चालक ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे-मुंबई महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टॅंकरने धडक दिल्याने चालक ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी पुरमेपाडा गावाजवळ घडली.

कांतिलाल गोविंद शर्मा (वय २५, रा.पिपलोदा जि.रतलाम) असे ठार झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, शनिवारी दुपारी मुंबईकडे जाण्यासाठी रस्त्यावर उभा होता. ह्या ट्रक मध्ये प्लास्टिक ड्रममध्ये काही केमिकल युक्त रसायन होते. यामुळे उग्र वास येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले हा ट्रक धुळ्याहुन मुंबईकडे जाताना टँकर (युपी बी एन ३२११) ने पाठिमागुन जोरदार धडक दिली. अज्ञात टँकर चालक वाहनासह घटनास्थळाहुन फरार झाला.

स्थानिक लोकांच्या मदतीने जखमी अवस्थेत शर्मा यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले .डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. धुळे तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालका विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. महामार्गवर अपघाता नंतर वाहन बाजुला करण्यासाठी क्रेन व जेसीबीची मदत घेण्यात आली. महामार्गावर एकेरी वाहतुक सुरु होती.

सिनेजगत

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

 

You might also like