महिला तहसीलदाराला जिवंत जाळत होते समाजकंटक, ड्रायव्हरनं केले वाचविण्याचे प्रयत्न, जाणून घ्या चालकाचं काय झालं

हैदराबाद : वृत्तसंस्था – जमिनीच्या वादातून तहसीलदार कार्यालयात आलेल्या एका व्यक्तीने तहसिलदार विजया रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल ओतून भर दिवसा तिला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना हैदराबादजवळील अब्दुल्लापरमेट येथे काल घडली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी या महिला तहसिलदाराच्या ड्रॉयव्हरचाही मृत्यू झाला आहे. विजया यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना ड्रायव्हरही गंभीर जखमी झाला होता.

विजया यांचा ड्रॉयव्हर चालक गुरुनाथम यांच्यासह विजयाला वाचविण्याचा प्रयत्न करताना दोन कर्मचारीही जखमी झाले होते . हल्लेखोरही या घटनेत सुमारे 60 टक्के भाजला आणि तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. राचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश एम भागवत यांनी माहिती दिली की , “गुरुनाथम रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्थानिक के. सुरेश हा सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तहसीलदार कार्यालयात आला होता. त्याने तहसीलदार रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळले. हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला हा हल्लेखोर काही अंतर धावल्यानंतर खाली कोसळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश हा स्थानिक शेतकरी तसेच मालमत्ता खरेदी-विक्री एजंट असून याचा समिनीशी संबंधित काही वाद होता, त्यासाठी तो तहसीलदार कार्यालयात आला होता.

Visit : Policenama.com