Video : केवळ बाइक स्टंट करण्यास विरोध केला म्हणून तरुणाला तब्बल 28 वेळा भोसकलं

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बाइक स्टंट करण्यास विरोध केला म्हणून अल्पवयीन मुलाने दोन मित्रांसोबत मिळून 25 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने आरोपीला दिल्लीमधील रघुबीर नगर परिसरात बाइक स्टंट करण्यास विरोध केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने तरुणावर तब्बल 28 वेळा चाकून वार केले. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी त्याच्यावर चाकूने वार करतच होता. मनिष असे खून झाल्याचे तरुणाचे नाव असून तो रघुबीर नगरचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या खूनामध्ये सहभागी असलेले सर्व आरोपी अल्पवयीन असून 8 जुलैला ही घटना घडली आहे.

हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत आरोपी मनिषला रस्त्यावर ओढत असून नंतर चाकूने वार करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावेळी मुख्य आरोपी असणारा तरुण मनिषच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर चाकूने वार करत होता. महत्त्वाचं म्हणजे यावेळी रस्त्यावर गर्दी होती. पण एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे न येता तेथून पळून गेले. आरोपींना पळ काढल्यानंतरही काहीजण मृतदेहाकडे पाहून निघून जात होते. पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.