ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाईन – मशागत करताना ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन उलटल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याचीं घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडला.

प्रमोद देवराम तायडे (वय ३८) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

यावल तालुक्यातील किनगाव खुर्द परिसरात प्रमोद तायडे हे कांदा व्यापारी आणि भाडे तत्वावर शेत मशागत करून देतात. ते शेतात मशागत करून देण्यासाठी इचखेडा शिवारात आले होते. त्यावेळी ते ट्रॅक्टरने दुपारी शेतातील विहीरीजवळ काम करत होते. त्याचवेळी वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर उलटले. त्यानंतर त्याखाली दबून प्रमोद यांचा दाबून जागेवरच मृत्यू झाला.

गावकऱ्यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रमोद यांचा मृतदेह बाहेर काढला.