Driving Licence lost | ड्रायविंग लायसन्स हरवलंय? चिंता नको ‘हे’ करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Driving Licence lost | भारतात कागदपत्रांशिवाय कोणतेही काम होत नाही. बरीच काम कागदपत्रं ऐनवेळी आपल्याकडे नसल्यामुळे रखडून राहतात. त्यात जर एखादं महत्त्वाचं कागदपत्र हरवलं तर त्याची दुबार प्रत काढायचा वेगळा ताण असतो. त्यातही जर ते कागदपत्र वाहनचालक परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन्स असेल तर कागदपत्र सादर करू न शकल्यामुळे पोलीस तुमची पावती फाडू शकतात. अशावेळी तुम्ही कागदपत्रांची ऑनलाइन बरोबर ठेऊ शकता, पण कधी ना कधी तुम्हाला त्याची सत्यप्रत लागेलच. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती प्रत मिळवण्याची प्रक्रिया. तेही घरबसल्या- (Driving Licence lost)

 

महाराष्ट्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याचे काही नियम आहेत. पहिले म्हणजे, तुमचा परवाना हरवला किंवा नष्ट झाला असेल, तर दुसरा म्हणजे परवाना फाटला/तुटला किंवा परवान्यावरील तपशील पुसला गेल्यास आणि तिसरा परवान्यावरील तुमचा फोटो बदलण्याची गरज असल्यास.

 

त्यानंतर परवाना मिळवायची प्रक्रिया पुढीलप्रमाणे

पहिल्यांदा, तुम्हाला https://parivahan.gov.in/parivahan या संकेतस्थळावर जावं लागेल आणि नंतर ऑनलाइन सर्व्हिस सेक्शन निवडावे ऑनलाइन सर्व्हिस सेक्शनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवेच्या पर्यायावर क्लिक करा.
तिथे तुमचे राज्य निवडा आणि proceed वर क्लिक करा.

यानंतर, अप्लाय फॉर डुप्लिकेट डीएलवर क्लिक केल्यानंतर, सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि कंटिन्यू बटणवर क्लिक करा.

यानंतर, तुमचा DL क्रमांक, जन्मतारीख, कॅप्चा कोड टाकल्यानंतर Get DL वर क्लिक करा.
परवाना तपशील पडताळल्यानंतर, मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक नमूद करा.
यानंतर तुम्हाला सेवांची यादी दिसेल, त्यापैकी ‘इश्यू ऑफ डुप्लिकेट डीएल’ निवडा आणि proceed वर क्लिक करा.
पुढे एक नवीन पेज उघडेल, येथे ड्युप्लिकेट लायसन्ससाठी अर्ज का करत आहात याचं कारण नमूद करावं लागेल.
कारण सांगितल्यानंतर तुम्हाला कन्फर्म बटणावर क्लिक करावे लागेल.
स्क्रीनवर दाखवलेला कोड एंटर करा आणि सबमिट बटण दाबा. सबमिट बटण दाबल्यानंतर, तुम्हाला पोचपावती स्लिप मिळेल, जी तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा त्याची प्रिंट काढू शकता आणि ती तुमच्याकडे ठेवू शकता.
तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन पेमेंट करताच, तुमचा अर्ज आरटीओकडे पाठवला जाईल.

 

ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला फक्त फॉर्म २, मूळ परवाना, शुल्क भरल्याची पावती, परवाना हरवला असल्यास पोलीस केस केल्याचा पुरावा, या सर्वांची पावती घेऊन संबंधित आरटीओ क्षेत्रीय कार्यालयात सादर करावे लागेल. त्यानंतर तुमच्या परवान्याची दुबार प्रत तुमच्या घरी पाठवली जाईल.

 

Web Title :- Driving Licence lost | driving license application check how to apply for duplicate dl on sarathi parivahan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Pimpri Chinchwad Bandh | महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात गुरुवारी पिंपरी-चिंचवड बंद, छत्रपती संभाजीराजे होणार सहभागी

Pune PMC News – Parvati Hill | ‘पर्वती हिलटॉप हिलस्लोपवरील जागा रहिवासी करून मूळ मालकाला देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी नको’ – सर्वोच्च न्यायालय