तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा होणार कायापालट

नवी दिल्ली:वृत्तसंस्था – येत्या काही महिन्यात तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा कायापालट झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासीत प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार आहे. तसेच नवी गाडी घेणार असलेल्या ग्राहकांच्या गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही ड्रायव्हिंग लायसन्ससारखंच असणार आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्समध्ये सिक्युरिटी फीचर्ससाठी क्यूआर कोडसुद्धा देण्यात येणार आहे. तसेच तुमचं आरसी बुकही एटीएमसारखेच होणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’263c488c-d061-11e8-b3a9-6bd35c6f0283′]

येथे देखील स्मार्ट कार्ड

ट्रॅफिकसंदर्भातील माहिती या नव्या कार्डांद्वारे तुम्हाला प्राप्त होणार आहे. तसेच प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासंबंधीच्या सर्व सूचना या कार्डांद्वारे देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत वाहनपरवाना व गाडीची कागदपत्रे (आरसी) एका छापील कागदावर दिले जात आहेत. मात्र, नव्याने देण्यात येणाऱ्या वाहनपरवाना आणि आरसी स्मार्टकार्डमध्ये मायक्रोचिप आणि क्यूआर कोड असणार आहे. तसेच या नव्या वाहन परवान्यात एटीएम आणि मेट्रोसारखे निअर-फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) फीचर असेल.

या नव्या फिचरमुळे वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांना संबंधित वाहन आणि वाहनचालकाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीला प्रदूषणासंबंधी चाचणी करायची असेल तर त्याला गाडी मालकांची परवानगी घ्यावी लागत होती, परंतु आता त्याची गरज नाही, असंही या अधिकाऱ्याने सांगितले. दिव्यांग चालकांसाठी खास डिझाईन बनवण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहिती ही आरसी बुकमध्ये असणार आहे.

[amazon_link asins=’9380349300,8172234988′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5302aef2-d061-11e8-b99e-71c4ab0dd150′]

मराठी माणूस मागे आहे हा भ्रम काढून टाका : राज ठाकरे