‘ड्रायव्हिंग लायसन्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय ! मोटर वाहन नियमात बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – आता हलके तसेच मध्यम कलर ब्लाईंड असणारे लोकसुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात. केंद्रीय रस्ते परिवाहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत मोटर वाहन नियमात आवश्यक दुरूस्तीसाठी अधिसूचना जारी केली. मंत्रालयाने म्हटले की, जगाच्या अन्य भागात सुद्धा अशी परवानगी आहे.

नव्या दुरूस्तीची अधिकसूचना जारी

मंत्रालयाने सांगितले की, रस्ते परिवाहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन (सीएमव्ही) नियम-1989 च्या फॉर्म-1 आणि फॉर्म-1ए मध्ये दुरूस्तीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे हलका आणि मध्यम रंग आंधळेपणा असणार्‍या नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे.

रंग आंधळेपणा असला तरी लायसन्स मिळणार

मंत्रालयाने म्हटले की, दिव्यांग नागरिकांना परिवहन अधारित सेवा विशेषता ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. दिव्यांग नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम जारी केले आहेत. आता कलर ब्लाइंड लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार आहे.

मंत्रालयाला या बाबतीत माहिती देण्यात आली होती की, कलर ब्लाईंड नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स दिले जात नाही. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ संस्थांचे मत मागवण्यात आले होते. त्यांच्या शिफारशीवर आधारीत हलके तसेच मध्यम वाहनांचे परवाने देण्याची परवानगी देण्यात आली आहे. गंभीर वर्ण आंधळेपणा असणार्‍यांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येणार नाही.