Driving License | खुशखबर ! जर मोबाइलमध्ये असेल डॉक्यूमेंट्सची कॉपी तर भरावे लागणार नाही चलान, जाणून घ्या नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Driving License | केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी वाहन चालकांना दिलासा (Driving License) देत आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने वाहन कायद्याच्या नियम क्रमांक 139 मध्ये सुधारणा केली आहे, ज्यामध्ये आता वाहन चालकांना गाडीचे कागदपत्र सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. हे कागदपत्र डिजिटल फॉर्मेटमध्ये मोबाइलमध्ये सेव्ह करून, आवश्यकता असेल तेव्हा पोलिसांना दाखवू शकता. याबाबत सरकारने नोटिफिकेशन सुद्धा जारी केले आहे.

डिजिटली ठेवू शकता कागदपत्रे
सरकारच्या निर्णयानंतर आता दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) सह संपूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) आणि पीयूसी सर्टिफिकेट, गाडी चालवताना सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. आता वाहन चालक ट्रॅफिक पोलीस आणि परिवहन विभागाला डिजी-लॉकर (DigiLocker) किंवा एम-परिवहन (m-Parivahan App) मोबाइल अ‍ॅपमध्ये डिजिटली ठेवलेले डॉक्यूमेंट (Driving License) दाखवू शकतो.

मिळाली कायदेशीर मंजूरी
केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानंतर आता
सर्व राज्यांमध्ये m-Parivahan अ‍ॅप आणि DigiLocker मध्ये सेव्ह केलेली कागदपत्र व्हॅलिड मानली जातील.
यास आता कायदेशीर मंजूरी मिळाली आहे.

पोलीस करू शकत नाहीत जबरदस्ती
सरकार याबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये न्यूजपेपरमध्ये जाहिरात देऊन लोकांना माहिती देत आहे.
मुळे कागदपत्र दाखवण्यासाठी वाहतूक पोलीस वाहन चालकाला जबरदस्ती करू शकत नाहीत.
कारण आता डिजिटल फॉमेंटमधील कागदपत्रे कायदेशीर झाली आहेत.

Web Titel :- Driving License | if there is a digital copy of the driving license rc and pollution certificate then the challan will not be there know what is the new rule of the government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Corona Violation Rules | कोरोना नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात, नवी मुंबईच्या तीन बारवर 50-50 हजार रूपयांचा दंड

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 7 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना 24 तासाच्या आत तावरे कॉलनी परिसरातून अटक