Driving License New Rules | जर तुम्ही सुद्धा बनवण्यासाठी जात असाल DL तर जाणून घ्या आजपासून काय आहे नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  परिवहन मंत्रालयाने (Ministry of Transport) लायसन्स (License) बनवण्याचे नवीन नियम (Driving License New Rules) तयार केले आहेत, ज्यानंतर आता रजिस्टर्ड ड्रायव्हिंग सेंटर्समधून (Registered Driving Centers) यशस्वीपणे ट्रेनिंग घेणार्‍या उमेदवारांना Driving License बनवण्यासाठी पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट (Driving test) द्यावी लागणार नाही.  new rules for driving license will be applicable from today know how it will be easy to make dl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

RTO च्या फेर्‍या माराव्या लागणार नाहीत

येथे लक्षात घेण्यासारखे हे आहे की, ज्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करता ते पूर्णपणे मान्यताप्राप्त असायला हवे.
या सेंटरमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट पास केल्यानंतर तुम्हाला Driving License मिळेल आणि आरटीओच्या फेर्‍या माराव्या लागणार नाहीत.
डीएलचे नवीन नियम (DL New Rules) आजपासून लागू झाले आहेत.

सेंटर्ससाठी ही गाईडलाईन्स

ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टच्या पूर्ण प्रोसेस ऑडिटसाठी इलेक्ट्रॉनिक प्रकारे रेकॉर्ड केली जाईल.
विशेष बाब म्हणजे ड्रायव्हिंग टेस्टसाठी त्याच ट्रेनिंग सेटर्सला मान्यता दिली जाईल जी गाईडलाईन्सचे पूर्ण पालन करतील.
या गाईडलाईन्समध्ये ड्रायव्हिंग सेंटर्सजवळ टेस्टसाठी ठिकाण, ड्रायव्हिंग ट्रॅक (Driving track) आणि बायोमेट्रिक सारख्या फॅसिलिटीज असणे आवश्यक आहे.

जर एखादे ड्रायव्हिंग सेंटर (Driving center) या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत नसेल तर त्यास मान्यता दिली जाणार नाही. सोबतच जर एखाद्या उमेदवाराने अशा सेंटरमधून टेस्ट पास केली तरी त्यास लायसन्स दिले जाणार नाही.

Web Title : Driving License New Rules | new rules for driving license will be applicable from today know how it will be easy to make dl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vitamin K | शरीर निरोगी ठेवण्यासाठी का आवश्यक आहे व्हिटॅमिन के? जाणून घ्या फायदे