Driving License | 31% लोकांचे केवळ ‘या’ एका चुकीमुळे बनू शकत नाही ‘DL’, टेस्टच्या दरम्यान ‘हे’ लक्षात ठेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनवताना आपल्याला आरटीओ (RTO) मध्ये वाहन चालवून दाखवावे लागते, ते सुद्धा आरटीओच्या मापदंडासह. या चाचणीत पास झाल्यानंतरच ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाते. नुकतेच सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळवण्यासाठी नवीन नियम (New Rules for DL) लागू केले आहेत, यानंतर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी सरकार आणखी एक ऑनलाइन अ‍ॅप्लीकेशनसह राज्यात RTO ची संख्या वाढवत आहे. तर दुसरीकडे लायसन्स मिळवण्याच्या चाचणीत आणखी काही मापदंडांचा समावेश करत आहे.

मंत्रालयाने केला खुलासा

आरटीओ चाचणीच्या वेळी वाहन चालवताना लोक अनेक प्रकारची सावधगिरी बाळगतात,
परंतु एक चूक आहे ज्यामुळे ते चाचणीत नापास होतात आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनू शकत नाही.
रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग (Ministry of Road Transport and Highways) च्या एका रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
ही चूक कोणती आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी चाचणी देतेवेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
ते जाणून घेवूयात

यामुळे होतात नापास –

रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने देशभरातील आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घेण्यात येणार्‍या चाचणीच्या अहवालातून नापास होण्याचे मुख्य कारण जाणून घेतले तेव्हा समजले की, चारचाकी वाहनांच्या चाचणी दरम्यान 31 टक्के लोक वाहन रिव्हर्स करताना चूक करतात.
म्हणजे ते समोर चालवण्यासह डावीकडे-उजवीकडे वाहन वळवतात, परंतु जेव्हा वाहन रिव्हर्स करण्याची वेळ येते तेव्हा चूक करतात.

 

कसे असतील नवीन नियम –

आता काही दिवसांपूर्वी सभागृहात नवीन नियम आणि पासिंग टक्केवारीवर एका लेखी ÷उत्तराद्वारे
केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराला किमान 69 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे, यानंतरच तो पुढील चाचणीसाठी पात्र होईल.
सोबतच अर्जदारांकडे काही स्पेशल स्किल जसे की, मर्यादित अंतरात गाडी डावीकडे-उजवीकडे किंवा रिव्हर्स करणे आणि योग्य प्रकारे चालवणे अनिवार्य होईल.
टेस्टमध्ये रिव्हर्स दरम्यान अर्जदाराच्या अचूकतेवर लक्ष दिले जाईल.

अशी असेल नवीन टेस्ट –

अर्जदाराला टेस्ट देण्यासाठी अपॉईंटमेंटदरम्यान केवळ एकच व्हिडिओ लिंक उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामध्ये ड्रायव्हिंग टेस्टबाबत पूर्ण माहिती असेल.
यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकवर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून टेस्टचा डेमो अर्जदाराला दाखवला जाईल.

 

Web Title : driving license of 31 percent people is not made by just one mistake keep in mind during the test

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Central Government | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नोकरी गमावणार्‍यांना 2022 पर्यंत मिळेल PF

Diabetes | सायलेंट किलर आहे डायबिटीज, ‘या’ 7 वस्तूंनी ब्लड शुगर होईल नैसर्गिकरित्या नियंत्रित

Union Minister Narayan Rane | ‘एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत, BJP मध्ये आले तर स्वागतच’