भन्‍नाट ! देशात पहिल्यांदाच ड्रोनव्दारे पोहचले रक्‍ताचे नमुने हॉस्पीटलमध्ये

देहरादून : वृत्तसंस्था – आजच्या या तंत्रज्ञानाच्या जगात माणूस आपल्या सोयीसाठी अनेक नवीन गोष्टी तयार करत असतो. तसेच ग्रीन कॉरिडॉर द्वारे अनेकदा कमीत कमी वेळा मानवी अवयव एका याठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवल्याचे देखील आपण अनेकदा ऐकत असतो. अशाच प्रकारची एक घटना ऊत्तराखंडमधील देहरादूनमध्ये घडली आहे. अतिशय दुर्गम भागातून एका ड्रोनद्वारे रक्त्याचे नमुने यशस्वीरित्या हॉस्पिटलपर्यंत पोहचवण्यात यश आले आहे. त्यामुळे भविष्यात यापेक्षा जास्त वेगवान तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मानव प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.

अतिशय दुर्गम भागात असलेल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रातून हे रक्त ड्रोनद्वारे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले. कमीत कमी वेळात हे रक्त पोहोचवण्याची कामगिरी या ड्रोनने केली. यासंदर्भात बोलताना मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एस पंगाती यांनी सांगितले की, हा प्रयोग टिहरी गढवालमधील चालू असलेल्या टेली-मेडिकल प्रकल्पाचा एक भाग होता. नंदगांव पीएचसीपासून बुराडी हॉस्पिटलपर्यंतचा ३६ किलोमीटरचा प्रवास फक्त १८ मिनिटांत ड्रोनने पार केला. त्याचबरोबर हे रक्त खराब होऊ नये यासाठी देखील विशेष काळजी घेण्यात आले होती. यासाठी या ड्रोनमध्ये एक कूलिंग किट देखील ठेवण्यात आले.’

दरम्यान, हा ड्रोन बनवणाऱ्या कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्याकडे तयार केलेल्या ड्रोनमध्ये कूलिंग किटसोबत आपत्कालीन औषधे आणि रक्त नमूने पोहचवण्याची क्षमता त्याच्यांकडे आहे. तसेच हा ड्रोन बनवण्यासाठी जवळपास १० लाख रुपये इतका खर्च आला आहे.