#Video : ऐकावे ते नवलच ; आता येणार डोक्यावर न पकडता उडणारी छत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपण पावसाळ्यात आपले शरीर भिजू नये म्हणून छत्री वापरतो. छत्री हातात सतत धरून हात अवघडून जातो. समजा, जर छत्री हातात धरायची गरजच नाही भासली तर … किती छान. ही कल्पना नसून अशी छत्री अस्तित्वात आलेली आहे. ही आहे ड्रोन अम्ब्रेला. ही छत्री तुमच्या डोक्यावर हवेत उडत उडत तुमच्या सोबत चालणार आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी या ड्रोन अम्ब्रेलाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

‘आमचे लक्ष आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली ऑटोनमस कार आणि गाड्यांवर आहे, परंतु पाऊस जवळ येत असताना मी ऑटोनॉमस अम्ब्रेलाबाबत अधिक उत्सुक आहे’, असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ड्रोन छत्रीमध्ये AI आणि कॅमेऱ्याचा वापर
या ड्रोन अम्ब्रेलात एक कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे या छत्रीला आपल्या वापरकर्त्याला ट्रॅक करणे आणि फॉलो करणे शक्य झाले आहे. ही छत्री वापरकर्त्याच्या डोक्यावर थोडेसे वर उडत राहत ड्रोन प्रमाणे त्याच्या सोबत जात राहते. या अम्ब्रेलाचा उपयोग पावसात आणि उन्हात करता येणार आहे. या छत्रीत मॅन्युअल कंट्रोल, एक ऑटोमॅटिक ‘फॉलो मी’ मोड आणि इतर अनेक फन्क्शन्स आहेत.

You might also like