नक्षलवाद्यांच्या शोधमोहिमेसाठी 500 कोटींचे ड्रोन, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – गृहमंत्री झाल्यानंतर अनिल देशमुख हे पहिल्यांदाच गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात नलक्षविरोधी अभियानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांच्या शोध मोहिमेसाठी 500 कोटी रुपयांचे अत्याधुनिक ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. तसेच नक्षलविरोधी अभियानात पोलिसांना चांगले यश येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जंगलात लपून राहणाऱ्या नक्षलवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि अभियानादरम्यान त्यांचा शोध घेण्यासाठी गृहविभागाकडून 500 कोटी रुपयांचे ड्रोन खरेदी केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एल्गार आणि कोरेगाव भीमा परिषदेच्या तपासात काही लोकांवर आकसपूर्ण कारवाई झाली. तत्कालीन सरकारच्या विचारांविरुद्ध जाणाऱ्यांना त्यांनी शहरी नक्षलवादी ठरवून अडविण्याचा प्रयत्न केला.

कोरेगाव भीमा आणि एल्गार प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने नेण्यात आला असल्याचे सांगत देशमुख यांनी कायदेशिर मार्गदर्शन घेऊन या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत केला जाईल असे सांगितले. सेक्शन 56 प्रमाणे एखाद्या घटनेचा तपास करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पण हे करताना राज्याला विश्वासात घ्यायला हवे होते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.