ड्रग्स कनेक्शन मध्ये ‘या’ 5 दिग्गजअभिनेत्रींची नावं आली समोर, चॅट मध्ये ‘D N S K’ कोडचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करणारा एनसीबी हळूहळू बॉलिवूड ड्रग साखळी क्रॅक करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे तो गेल्या काही काळापासून सक्रिय आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या या तपासणीत अद्यापपर्यंत अनेकांना अटक झालेली आहे आणि अजून बऱ्याच जणांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत, ज्यांच्यावर टांगती तलवार दिसत आहे.

दीपिका पादुकोण

नुकत्याच झालेल्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या खुलाशामध्ये दीपिका पादुकोणचे नाव समोर आले आहे. वास्तविक, एनसीबीच्या या तपासात दीपिका पादुकोणचं जया साहाची मॅनेजर करिश्माशी झालेल्या चॅट्स समोर आल्या आहेत. जया साहा सुशांत सिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर होती जिची आज एनसीबीने चौकशी केली आहे.

करिश्मा आणि दीपिकाच्या या संभाषणानंतर संपूर्ण बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. दीपिका यात करिश्माला विचारत आहे, ‘तुमच्याकडे माल आहे का’. प्रत्युत्तर म्हणून करिश्मा म्हणते – ‘हो … पण घरी. मी वांद्रे मध्ये आहे …’

श्रद्धा कपूर

सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरची चॅटही समोर आली आहे, यामध्ये श्रद्धा जयाकडून सीबीडी तेल आहे का अशी चौकशी करत आहे. हे एक प्रकारचे ड्रग आहे. तथापि, हे तेल कायदेशीर आहे असे जयाचे म्हणणे आहे.

नम्रता शिरोडकर

चॅट मध्ये काही इंग्रजी अक्षरे कोड म्हणून वापरली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कोड डीकोडिंगवर, नम्रता शिरोडकर हिचे नाव देखील बाहेर आले. कोड्सनुसार (डी म्हणजे दीपिका पादुकोण, एन म्हणजे नम्रता शिरोडकर, एस म्हणजे श्रद्धा कपूर आणि के म्हणजे करिश्मा प्रकाश).

रकुल प्रीत

ड्रग्स कार्टेल प्रकरणातही रकुल प्रीतचे नाव समोर आले आहे. हे नाव समोर आल्यानंतर रकुल प्रीत सिंहने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी आपल्या विरोधात होणारे मीडिया कव्हरेज बंद करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारे आपली प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रकुलने म्हटले आहे.

सारा अली खान

सुशांतची गिर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या चौकशीदरम्यान श्रद्धा कपूरचे नावदेखील समोर आले होते. रियाने ड्रग्सच्या व्यवहारात साराचे नाव घेतले. जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर ड्रग्स प्रकरणातील चौकशीसाठी एनसीबी सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना या आठवड्यात समन्स पाठवू शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like