Drug Case : मुंबईत अनेक ठिकाणांवर NCB ची छापेमारी, परदेशी नागरिक ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रग केसमध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) आज मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. कालच एनसीबीने महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांस अटक केली होती. या अटकेनंतर एनसीबीच्या अनेक टीम मुंबईच्या वेगवेगळ्या भागात छापेमारी करत आहेत.

छापेमारी दरम्यान एनसीबीने मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटलमधून एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीला अटक करताच त्याने एक पावडर सारखा पदार्थ गिळला, ज्यामध्ये कोकीन असण्याचा संशय आहे. या परदेशी नागरिकाची माहिती किंगपिन करण सजनानीच्या चौकशीतून मिळाली होती.

समीर खानला बुधवारी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर त्याला अटक केली. समीर खानच्या चौकशीत खुलासा झाल्यानंतर एनसीबीने उत्तर प्रदेशच्या रामपुरमध्ये छापेमारी केली. समीर खानच्या ड्रग्ज लिंकचा शोध घेतला जात आहे. त्याच्यावर ड्रगच्या किंगपिनशी संबंध ठेवण्याचा संशय आहे. आज त्याला कोर्टात सादर केले जाईल.

एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यानुसार, खारमध्ये करण सजनानीच्या घरात गांजाचा साठा जप्त करण्यात आला होता. करण सजनानी, राहिल फर्नीचरवाला, शाइस्ता फर्नीचरवाला आणि राम कुमार तिवारीला एनडीपीएस अ‍ॅक्टच्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आणि न्यायालयात सादर करण्यात आले.

एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी म्हटले की, तपासादरम्यान बांद्रा येथे राहणार्‍या समीर खानचे नाव समोर आले, ज्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर समीर खानला अटक करण्यात आली आणि मुंबईत अनेक ठिकाणांवर एनसीबीची टीम छापेमारी करत आहे.

नवाब मलिक म्हणाले – कायद्यापेक्षा वर नाही
जावई समीर खानच्या अटकेनंतर महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले नवाब मलिक यांनी म्हटले की, कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही आणि त्यास कोणताही भेदभाव लागू होऊ नये. कायदा आपली योग्य पावले उचलेल आणि न्याय होईल. मी आपल्या न्यायपालिकेचा विश्वास आणि सन्मान करतो.