Drug प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टलला NCB ने केली अटक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (NCB) ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट पॉल बार्टलला अटक केली आहे. पॉल बार्टल हा अटक केलेले ड्रग्ज सप्लायर अगिसिआलोस डेमेट्रियाड्स आणि अभिनेता अर्जुन पाल यांचा जवळचा मित्र आहे. बुधवारी रात्री एनसीबीने बांद्राच्या त्याच्या घरावर छापा टाकला आणि त्याला गुरुवारी चौकशीसाठी बोलावले व सुमारे 9 तास चौकशी करून त्याला अटक केली.

असे सांगण्यात आले आहे की, मुंबईच्या बांद्रा परिसरात काल रात्री एनसीबीने छापा टाकला. पॉल ग्रीयड या व्यक्तीच्या घरावर छापा टाकल्यानंतर एनसीबीने त्यांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले. पॉल ग्रीयड हे अर्जुन रामपालच्या जवळचे मित्र असल्याचे म्हटले जाते. समन मिळाल्यानंतर पॉल ग्रीयड यांनी आपले निवेदन नोंदवण्यासाठी एनसीबी कार्यालय गाठले.

कन्स्ट्रक्शन प्रकल्पांमध्ये सामील आहे पॉल
बुधवारी सायंकाळी उशिरा शोध घेत एनसीबीने ज्या पॉल बार्टलला बोलावले ते प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियन नागरिक आहे आणि ते पेशाने आर्किटेक्ट आहेत आणि मुंबईतील वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक कन्स्ट्रक्शन प्रकल्पात ते सामील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबी अद्याप त्यांची चौकशी करत आहे आणि ड्रग्ज प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉल अटक केलेले ड्रग्ज सप्लायर अगिसिआलोस डेमेट्रियाड्स आणि अभिनेता अर्जुन पाल या दोघांचा जवळचा मित्र आहेत.