Bollywood Drugs Case : प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंहच्या घरी NCB चा छापा ! अभिनेत्रीला पतीसह बजावलं समन्स

पोलीसनामा ऑनलाइन  – सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) आतापर्यं अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापेमारी केली आहै आणि त्यांचा पुढील तपास सुरूच आहे. अशात एनसीबीच्या टीमनं शनिवारी महिला कॉमेडीयन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) हिच्या घरावर छापा मारला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या टीमला भारतीच्या घरी काही प्रमाणात ड्रग्ज आढळून आले आहेत. परंतु याचं प्रमाण नेमंक किती आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. एनसीबीच्या टीमनं भारती सिंह आणि तिच्या पतीला समन्स बजावलं आहे.

You might also like