Sushant Singh Rajput drugs case : गोव्यात NCB ची मोठी कारवाई, सुशांतसिंह राजपूतला ड्रग देणारा जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवंगत बॉलिवू़ड अभिनेता सुशांतसिंह राजपुत याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या प्रकरणी नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोलला (NCB) मोठे यश आले आहे. NCB ने थेट गोव्यात छापेमारीला सुरुवात केली काही ड्रग पेडरला ताब्यात घेतले आहे. यात सुशांतसिंह रजपुतला ड्रग पुरविणारा माफिया देखील हाती लागल्याची माहिती एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली. कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आल्याचे एनसीबीने सांगितले.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नुकतेच एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः विशेष न्यायालयात 11, 700 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांच्यासह 33 जणांची नावे आहेत. तसेच यात जप्त केलेले ड्रग्स आणि आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती, तसेच 200 साक्षीदारांची नावेही आहेत. एकूण 33 आरोपींपैकी अद्याप आठ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तर रिया आणि शोविक जामिनावर सुटले आहेत. अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींबाबत तपास सुरू असल्याचे एनसीबीने सांगितले. गेल्या वर्षी या प्रकरणाचा तपास सुरू झाला. अनेक अमली पदार्थ जप्त, मोबाईल जप्त केले. अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील माहिती मोबाइलमधून घेतल्याचे दोषारोपत्रात म्हटले आहे.