काय सांगता ! होय, भारतात ‘या’ औषधानं ‘तंदुरूस्त’ झाले ‘करोना’ग्रस्त, 6 रूग्णांचा हॉस्पीटलमधून ‘डिस्चार्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची भीती पसरलेली असताना शनिवारी दिल्लीतून दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. येथे सफदरजंग रुग्णालयातून कोरोनाग्रस्त 6 रुग्णांवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आले आहे. यामुळे संक्रमणानंतर ठीक झालेल्या लोकांची संख्या 10 झाली आहे. सर्व रुग्ण आता ठीक झाले आहेत. परंतु त्यांनी पुढील 14 दिवस घरात एकांतात राहण्यास सांगण्यात आले आहे. ठीक होणाऱ्या रुग्णांमध्ये तो पीडित देखील आहे, ज्याच्या इटलीहून परत आल्यानंतर राजधानी दिल्लीत व्हायरसचा पहिला रुग्ण समोर आला होता.

14 दिवसात ठीक झाला रुग्ण –

सफदरजंग रुग्णालयातून ज्या रुग्णांना उपचार करु सोडण्यात आले, त्यांंना 14 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर काही लक्षण दिसल्यास त्यानुसार उपचार केले जातील. डॉक्टरांच्या मते हे रुग्ण 14 दिवसात ठीक झाले. उपचारानंतर गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस या कोरोना ग्रस्तांची चाचणी घेण्यात आली ज्यात हे रुग्ण निगेटिव्ह असल्याचे कळाले.

तर दिल्लीतील ज्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्या 46 वर्षीय मुलाला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ते देखील कोरोनाने पीडित आहेत. परंतु डॉक्टरांनी त्यांची स्थिती स्थिर असल्याचे सांगितले. ते 23 मार्चला स्विझर्लंड आणि इटलीहून प्रवास करुन दिल्लीत आले होते. त्यांच्यामुळे त्यांच्या 68 वर्षीय आईला कोरोनाची लागण झाली होती.

माहितीनुसार, सफरदजंमध्ये कोरोनाने पीडित 10 रुग्ण दाखल झाले होते. तसेच 11 संशयित रुग्ण होते. संशयितांपैकी तिघांची चाचणी नेगेटिव्ह आली. बाकीच्या चाचणीचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. आतापर्यंत सफरदजंग आणि राममनोहर लोहिया रुग्णालयात 211 लोक असे आहेत जे कोरोना संशयित मानले जात आहेत.

टेमीफ्लूच्या औषधांनी आराम –

डॉक्टरांच्या मते, कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून जे रुग्ण ठीक झाले आहेत. त्यांना त्यांच्या लक्षणांच्या आधारे औषधे देण्यात आली. दुसऱ्या रुग्णालयाप्रमाणे येथे रुग्णांना अँटी एचआयव्ही औषधे देण्यात आली नव्हती. सफदरजंगमध्ये रुग्णांना स्वाईन फ्लू साठी देण्यात येणाऱ्या टॅमीफ्लूची औषधे देण्यात आली. रुग्णालयातून शनिवारी 4 संशयितांना उपचारानंतर सोडण्यात आले, ते निगेटिव्ह होते.