‘बिग बॉस फेम’ एजाज खान NCB च्या ताब्यात; छापेमारी सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘बिग बॉस 7 फेम’ अभिनेता एजाज खान याला ड्रग्ज केस प्रकरणात ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ (NCB) ने ताब्यात घेतले. ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज पेडलर शादाब बटाटा याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एजाज खान याचेही नाव समोर आले होते. एजाज खान राजस्थानहून मुंबईत परतत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.

एजाज खान हा बटाटा गँगमधील सदस्य असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एनसीबीची टीम आता एजाज खान याच्या अंधेरी आणि लोखंडवाला या ठिकाणी छापेमारीची कारवाई करत आहे. एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्ज सप्लायर फारूख बटाटा याचा मुलगा शाबाद बटाटा याला गेल्या काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून सुमारे दोन कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता एजाज खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. शादाब बटाटावर मुंबईच्या बॉलिवूड सेलिब्रिटीजला ड्रग्ज सप्लाय करण्याचा आरोप आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक धक्कादायक गोष्टींची माहिती मिळत आहे. त्यातच ड्रग्ज प्रकरणात अनेक छोट्या-मोठ्या सेलिब्रिटींची नावे आली आहेत. त्यानंतर आता याच प्रकरणातून अभिनेता एजाज खानला एनसीबीने ताब्यात घेतले आहे.