ड्रग तस्करांनी जाळले कोट्यवधींचे ‘जेट’, सैन्य करत होते पाठलाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मेक्सिकोमध्ये ड्रग स्मगलर्स त्याच्या विमानात कोकेन घेऊन जात होता, परंतु जेव्हा सैन्याच्या विमानाने त्याचा पाठलाग केला, तेव्हा त्याने असे काहीतरी केले ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. ड्रग स्मगलर्सने आपल्या जेटची दुतर्फा महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले. त्यानंतर, कोकेनने भरलेल्या विमानाला आग लागली. माहितीनुसार विमानाची किंमत 3.7474 कोटी ते 7.48 कोटी रुपये असल्याचे समजते. मेक्सिकोच्या युकाटिन पेनिंजुलामध्ये ही घटना घडली. मेक्सिकोच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे विमान दक्षिण अमेरिकेतून मेक्सिकोच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले होते. त्याच्या पाठोपाठ हवाई दलाची दोन विमाने आली तेव्हा स्मगलरने येथे लँडिंग करुन आग लावली. विमानात किती ड्रग होते, याची अद्याप माहिती नाही.

विमानाला आग लावल्यानंतर स्मगलर जंगलात पळून गेला. परंतु लष्कराला जवळच्या जंगलात कोकेनने भरलेला पिकअप ट्रक सापडला. त्यात 13 बॅगमध्ये सुमारे 385.55 किलो कोकेन होते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 4.5 मिलियन डॉलर्स म्हणजेच 37 कोटी रुपये आहे. विमानात आग लागल्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले होते. घटनेनंतर हा रस्ता बराच काळ वाहतुकीसाठी बंद होता. अद्याप या प्रकरणात पोलिस किंवा सैन्याला कोणालाही अटक करण्यात यश आले नाही.

एव्हिएशन सेफ्टी नेटवर्कने सांगितले की, ते जवळपास एक दशक जुने BAe-125 जेट विमान होते. यात 15 लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. त्याची किंमत 3.74 कोटी ते 7.48 कोटी रुपये असू शकते. आतापर्यंत त्याच्या निर्मितीची तारीख मिळालेली नाही. मेक्सिकन सरकारचे म्हणणे आहे की, हे ज्या कोणत्या ड्रग स्मगलरचे कोकेन आणि जेट होते, त्याला खूप मोठे नुकसान झाले आहे. ड्रग तर गेलेच पण त्याला त्याचे जेटही गमवावे लागले.

दरम्यान, मेक्सिकोमध्ये जगभरातील अनेक मोठे ड्रग कार्टल म्हणजेच स्मगलर आहेत. बर्‍याचदा त्यांच्यात चकमक, गोळीबारही होतो. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी मेक्सिको-अमेरिका सीमेजवळ एका बोगद्याच्या खुलासा केला. ज्यामध्ये छोट्या ट्रेनमधून तस्करी केली जात होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like