‘गंभीर गुन्ह्या’साठी मांजरीला अटक, पण तुरुंगातून झाली ‘फरार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका गंभीर गुन्ह्यासाठी एका मांजरीला अटक करून तुरूंगात टाकण्यात आले, पण नंतर ती तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाली. ही घटना श्रीलंकेची आहे. एका अहवालानुसार, मांजरीचा वापर ड्रग आणि सिमकार्डच्या तस्करीसाठी होत होता. श्रीलंकेच्या उच्च सुरक्षा वेलीकाडा जेलच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना शनिवारी मांजरीच्या माध्यमातून संशयास्पद कारवायांची माहिती मिळाली.

एका स्थानिक पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मांजरीकडून २ ग्रॅम हेरॉईन, २ सिमकार्ड आणि एक मेमरी चिप जप्त केली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, मांजरीच्या गळ्यात एक पाकिट बांधलेले होते, ज्यामध्ये सर्व वस्तू ठेवल्या होत्या. एका वृत्तसंस्थेनुसार, मांजर रविवारी जेलच्या खोलीतून पळून गेली.

श्रीलंकेला ड्रग्सच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. अलिकडच्या काळात श्रीलंकेच्या उच्च सुरक्षा वेलिकाडा कारागृहात ड्रग्ज, फोन आणि चार्जर्सच्या जप्तीच्या बर्‍याच घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात श्रीलंकेच्या पोलिसांनी कोलंबोमध्ये एक गरुड पकडले होते. पोलिसांनी सांगितले होते की, ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी गरुडाचा वापर केला जात होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like