Drugs And Medications : खाण्या-पिण्याच्या ‘या’ 8 वस्तूंमुळे औषधे ठरतात कुचकामी, जाणून घ्या – साइड इफेक्ट

नवी दिल्ली : जर तुम्ही एखादे औषध घेत असाल तर यासोबत काही खबरदारी सुद्धा घेतली पाहिजे. खाण्यापिण्याच्या काही वस्तू औषधांचा परिणाम कमी करतात. जर तुम्ही पहिल्यांदा एखाद्या आजारावर औषध घेत असाल तर यासाठी खबरदारी कशी घ्यायची हे आपल्या डॉक्टरांना विचारा. अशाच काही वस्तू आहेत ज्या औषधांसोबत घेणे टाळले पाहिजे, या वस्तू कोणत्या ते जाणून घेवूयात…

आंबट फळे –
जर तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर आंबट फळे खाणे टाळा. आंबट फळे 50 पेक्षा जास्त औषधांना प्रभावित करतात. ती फेक्सोफेनाडायन (एलेग्रा) वाढवतात, ज्यामुळे अ‍ॅलजी होऊ शकते, औषधांचा परिणामसुद्धा कमी होतो.

दूध –
डेयरी प्रॉडक्ट काही अँटीबायोटिक औषधांचा परिणाम योग्यप्रकारे होऊ देत नाही.

डार्क चॉकलेट –
जर तुम्ही एखाद्या आजारावर औषध घेत असाल तर यामुळे शरीराला आराम मिळतो. आराम मिळाल्याने झोप चांगली येते. मात्र, डार्क चॉकलेट शरीरात मिथाइलफेनाडेट बनवते जे शरीर उत्तेजित करते. यामुळे झोप येत नाही, औषधांचा परिणाम कमी होतो.

दारू –
दारू प्यायल्याने शरीरावर औषधांचा परिणाम होत नाही. विशेषकरून ब्लड प्रेशर किंवा हृदयरोगाची औषधे अजिबात परिणामकारक ठरत नाहीत. साईड इफेक्ट होतात.

मुलेठी –
मुलेठी पचनासाठी वापरली जाते. यातील ग्लायसीरिजिजिन, सायक्लोस्पोरिनसह अनेक औषधांचा परिणाम कमी करते. तसेच, ट्रान्सप्लांट करण्याचे एखादे औषध घेत असाल तरी मुलेठीचे सेवन करू नका.

आयर्न सप्लीमेंट –
जर हायपोथायरायडिज्मचे औषध किंवा मल्टिव्हिटॅमिनची एखादी गोळी घेत असाल तर हे जरूर पहा की यात आयर्न आहे किंवा नाही. आयर्न सप्लीमेंटची गरज असेल तर रेग्युलर औषधांसोबत हे घेऊ नका. डॉक्टरांना विचारून सेवन करा.

अँटी एपिलेप्टिक औषध –
ही औषधे मिरगीचा झटका कमी करतात परंतु, जर तुम्ही एखादी गर्भनिरोधक गोळी घेत असाल तर ती घेऊ नये. स्टडीनुसार, अँटी एपिलेप्टिक औषधे प्रेग्नंसी रोखण्याच्या औषधांचा प्रभाव कमी करतात. तसेच काही साइड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात.

व्हिटॅमिन के –
जर ब्लड क्लॉट्स रोखणारे औषध घेत असाल तर व्हिटॅमिन के च्या मात्रे बाबत सावध राहा. हे तुमचे रक्त पातळ करू शकते, औषधांचा परिणाम कमी करू शकते आणि बल्ड क्लॉटचा धोका आणखी वाढू शकतो. ब्रोकली, ब्रसेल्स स्प्राउट्स, केळे आणि पालकमध्ये व्हिटॅमिन के सर्वात जास्त आढळते. या वस्तू औषधासोबत खाऊ नका.