भारती सिंहवर भडकला राजू श्रीवास्तव, म्हणाले – ‘ड्रग्जशिवाय कॉमेडी करता येत नाही का ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉमेडियन भारती सिंहला शनिवारी ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली. तिचा नवरा हर्ष याचीही चौकशी करण्यात आली आहे. एनसीबीने शनिवारी भारतीच्या घरावर छापा टाकला होता आणि शनिवारी गांजा ताब्यात घेतला होता. भारती सिंहचे ड्रग्स प्रकरणात नाव आले म्हणून तिला अटक केल्याबद्दल कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘कलाकार असे का वागत आहेत?’

आज तकशी झालेल्या संभाषणात राजू श्रीवास्तव म्हणाले- मला अजिबात पटत नाही. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. बॉलिवूडमध्ये काय होत आहे? आणि कलाकार असे का वागतात? सुरुवातीला मला वाटलं की कदाचित एखाद्याने चौकशीचे लक्ष विचलित करण्यासाठी भारती आणि हर्षचे नाव घेतले असेल. परंतु आता हे समजते आहे की त्या लोकांनी ही वस्तुस्थिती स्वीकारली आहे. गांजाही जप्त करण्यात आला आहे.

ड्रग्सशिवाय कॉमेडी होऊ शकत नाही?

राजू पुढे म्हणाले, ‘हे सर्व घेण्याची काय गरज आहे. ड्रग्जशिवाय कॉमेडी होऊ शकत नाही का. भारती सोबत मी खूप काम केले आहे. मी तिच्या लग्नात गेलो होतो, लोक रात्रभर नाचत होते, कॉमेडी करत होते. मला ते तेव्हा लक्षात आले नाही की हे लोक इतके कॉमेडी कसे करतात, रात्रभर डान्स कसे करतात. मला असे वाटले की आपण लग्नाच्या आनंदाच्या भावनेत रात्रभर नाचत असतील, एनर्जी येत असेल. पण आता लक्षात येतंय त्याचं कारण.

कॉमेडियन राजू म्हणाले, ‘आम्ही सर्वजण भारतीचे खूप कौतुक करतो. किती मुले तिला आपले आदर्श मानतात. भारती सिंह बनू इच्छितात. भारती सिंहला फॉलो करत आणि इंडस्ट्रीमध्ये येत आहेत. पण तिला हे सर्व घेण्याची आवश्यकता का आहे? जनतेने टाळ्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेली नशा काय कमी असते का.

‘सर्व लोक असे नसतात. सर्व लोक यात सामील नाहीत. पण दररोज एखाद्याचे नाव बॉलिवूडमधून येत आहे. टीव्ही कलाकारांचे नाव येत आहे. हे लोक जबाबदार आहेत. मी त्यांचा बचाव अजिबात करणार नाही. मी खूप दुःखी आहे, आमचे सहकारी कलाकार असे कृत्य करीत आहेत आणि आम्हाला याची कल्पना नव्हती.’

You might also like