Drugs Case : ‘या’ प्रश्नांमुळं चौकशीदरम्यान दीपिका पादुकोणला अश्रू अनावर !

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्स कनेक्शन संदर्भात अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोण हिची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत दीपिकानं त्या ग्रुपची अ‍ॅडमिन असल्याचं कबुल केलं. या चौकशीत दीपिका इमोशनल ब्रेकडाऊन झाली.

एनसीबीच्या चौकशीत दीपिकाला ड्रग्स आणि त्या चॅट संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी दीपिका आणि करिश्मा प्रकाशला एकमेकींसमोर बसवून ड्रग्स चॅटवर प्रश्न विचारण्यात आले. यावेळी मात्र दीपिकाला रडू कोसळलं.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांना या चौकशीत दोघींनीही एकच गोष्ट सांगितली. वीड बद्दलच्या प्रश्नावर सांगितलं की, ही अतिशय साधी रोल्ड सिगारेट आहे ज्यात तंबाखू भरून ओढली जाते. आणि कोड भाषेत याला हॅश किंवा वीड म्हणतात.

या चौकशीत एनसीबीनं विचारलेल्या प्रश्नांमुळं दीपिका आधी घाबरली होती. परंतु प्रश्नांचा ओघ मात्र सुरूच होता. तेव्हा दीपिकाला अश्रू अनावर झाले आणि तिला रडू कोसळलं. ड्रग्स प्रकरणात एनसीबीनं दीपिकाला असे प्रश्न विचारले की, तिला आपलं रडू आवरताच आलं नाही. परंतु अद्यापही सत्य न सांगितल्यानं दीपिकाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like