ड्रग केस : सारावर प्रचंड रागावलाय सैफ अली खान ! लेकीला नाही करणार कोणतीच मदत ?

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग अँगलमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नाव समोर आली आहेत. यात दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्या नावाचाही समावेश आहे. एनसीबीनं शनिवारी तिघींनाही चौकशीसाठी बोलवलं होतं. या सगळ्यानंतर आता साराचे वडिल अभिनेता सैफ अली खान सारावर प्रचंड रागवला आहे अशी माहिती समोर आली आहे.

एका वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, सारावर तिचे वडिल सैफ अली खान खूप नाराज आहे. इतकंच नाही तर ड्रग्ज कनेक्शनमधून तिला वाचवण्यासाठी सैफनं हात मागे घेतले आहेत. या प्रकरणात साराला मदत न करण्याचं सैफनं ठरवलं आहे.

रिपोर्टनुसार, चौकशीत साराचं नाव पुढे आल्यांतर सैफ अतिशय नाराज झाला. त्यामुळं आपण कोणतीही मदत न करण्याचं ठरवलं असल्याचं त्यानं सांगितलं आहे.

आजी शर्मिला टागोर करतेय साराची मदत

ड्रग्ज प्रकरणात साराचं नाव समोर आल्यानंतर सैफ सारावरच नव्हे तर त्याची एक्स वाईफ अभिनेत्री अमृता सिंहवरही रागवला आहे. यानंतर सैफ आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर तैमूरसह दिल्लीला रवाना झाले आहेत. सध्या करीना प्रेग्नंट आहे.

सध्या करीना लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या शुटींगमध्ये बिजी आहे. जोपर्यंत करीना सिनेमाचं शुटींग करत आहे तोपर्यंत सैफ तिच्यासोबत असेल. त्यामुळं सारासाठी हा काळ खडतर असणार आहे. यावेळी वडिल जरी तिच्यासोबत नसले तरीही आजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर तिच्यासोबत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like