दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान ‘या’ तारखेला NCB च्या प्रश्नांना जाणार सामोरं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसांत प्रत्येकाला निवेदन नोंदवण्यासाठी हजर रहावे लागेल.

दीपिका पादुकोण मुंबईत नाही, अभिनेत्री 25 सप्टेंबरला एनसीबीसमोर येऊ शकते. रकुल प्रीत सिंग आणि सायमन खंबाटा यांना उद्या एनसीबीसमोर हजर व्हावे लागेल. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान 26 सप्टेंबरला एनसीबीसमोर हजर होतील.

यापूर्वी मंगळवारी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांनाही समन्स बजावले होते, परंतु प्रकाशची तब्येत बरी नसल्यामुळे तो एजन्सीसमोर हजर होऊ शकला नाही.

आवश्यकतेनुसार ते पदुकोणला बोलावू शकतात असे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले होते. सूत्रांनी सांगितले की, अमली पदार्थांविषयी व्हॉट्सअ‍ॅपवर झालेली संभाषणे एजन्सीच्या छाननीखाली आहेत.

आजही चौकशी चालू आहे
खरं तर ड्रग्सबाबत चर्चा करणार्‍या काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट एजन्सी रडारवर आहेत. पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि दीपिका यांच्यात या काही गप्पा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील एनसीबीने केलेल्या अंमली पदार्थांच्या चौकशी दरम्यान बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनचा खुलासा झाला.

सुशांत सिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहा, अबीगैल पांडे आणि सनम जोहरची आज एनसीबी टीमकडून विचारपूस केली जात आहे. जया साहाची सलग तिसर्‍या दिवशी चौकशी केली जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like