बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : NCB कडून करिश्मा प्रकाशची कसून चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमली पदार्थ नियंत्रक विभागाच्या (एनसीबी) ( NCB) समन्सकडे दुर्लक्ष करून करिश्मा प्रकाश ( Karishma Prakash ) हिने अटकपूर्व जामीन ( Bail) मिळण्यासाठी प्रयत्न केले पण तिला तो मिळाला नाही. अखेर आज तीने चौकशीसाठी कार्यालयात हजेरी लावली. करिश्मा प्रकाश ही बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनची ( Deepika Padukon) मॅनेजर आहे.

तिच्या घरात ड्रग्ज सापडल्यामुळे तिची कसून चाैकशी करण्यात आली. मात्र ती पूर्ण न झाल्याने आवश्यकतेनुसार तिला पुन्हा बोलाविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. करिष्माच्या याचिकेवर ७ नोव्हेंबरला सुनावणी करण्यात येईल तोपर्यंत तिला अटक न करण्याची सूचना न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

तर ती चौकशीसाठी गैरहजर राहत असल्याची तक्रार एनसीबीकडून ( NCB) करण्यात आली आहे. त्यावर कोर्टाकडून हमी देण्यात आल्यामुळे अखेर आज ती चौकशीसाठी हजर झाली.