पाकिस्तानचं ‘अंमलास्त्र’ ! पाकमधून होतोय ‘ड्रग्स’ सप्लाय ; काश्मीरी युवक ड्रग्सच्या ‘आहारी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जम्मू काश्मीर सतत दहशतवादाने धूमसणारे खोरे. तेथील दहशवादाची समस्या काही केल्या संपत नाही. परंतू आता याचाच फायदा दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने घेतला आहे. पाकिस्तानने भारतावर ड्रग्स अ‍ॅटॅक केला आहे. पाकिस्तानमधून सध्या काश्मीरात ड्रग्स सप्लाय केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. हेच ड्रग्स जम्मू काश्मीरमधील तरूणांना आपल्या कवेत घेत आहे. तरुणांना ड्रग्स देऊन त्यांना त्यांच्या करिअरमध्ये लक्ष लागू द्यायचं नाही तसंच कुटूंबाबद्दलच्या जबाबदाऱ्यांमध्ये लक्ष लागू द्यायचं नाही असा पाकिस्तानचा डाव शिजत आहे.

मगील 18 महिन्यात जेवढ्या प्रमाणात जम्मू काश्मीरमध्ये ड्रग्सचा सप्लाय झाला आहे त्यातील 80 टक्के सल्पाय हा पाकिस्तानातून झाला आहे. पाकिस्तनाच्या या कुरापती काश्मीरमधील तरुणांना विचार करण्यास न लावणे आणि त्यांना दहशतवादाला जोडण्याशी आहे. तेथील नशेत गर्त झालेल्या तरुणांकडून सांगण्यात येते की, त्यांना त्यांच्या मित्राकडून ड्रग्स सप्लाय करणाऱ्यांना भेटवण्यात आले. काही दिवस ड्रग्सचे सेवन केल्यानंतर त्याला त्या नशेने ग्रासले. आता ड्रग्स उपलब्ध नसेल तेव्हा ते एवढाच विचार करतात की त्यांना ड्रग्स कधी उपलब्ध होईल.

मागील 18 महिन्यात 80 टक्क्यापेक्षा जास्त ड्रग्सचा सप्लाय हा पाकिस्तनातून झाला आहे. तर 20 ते 25 टक्के सप्लाय पंजाब मधून होत आहे. सीमेवरून ड्रग्सचा सल्पाय सुरु असतो. रामबन बनिहाल नॅशनल हायवेच्या भागात ड्रग्स माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. जेव्हा पासून बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी पंजाबमधून होणाऱ्या ड्रग्स सप्लायवर नियंत्रण आणले आहे. तेव्हापासून सीमेवरुन ड्रग्सचा होणारा सप्लाय वाढला आहे.