ड्रग्स केस : सनम जौहर आणि अबिगॅल पांडेच्या घरावरील छापेमारीत मिळाले ड्रग्स, NCB कडून चौकशी सुरू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे. एनसीबीने ड्रग पेडलिंगचे आरोपी अनुज केशवानी आणि राहिल यांच्या चौकशीत टीव्ही स्टार्स अबीगैल पांडे आणि सनम जोहर यांची नावे उघडकीस आली होती, त्यानंतर त्यांना एनसीबीने समन्स बजावले आणि नंतर त्यांनी चौकशीसाठी एनसीबी कार्यालय गाठले.

दरम्यान, गुरूवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अबिगैल व सनम जौहर यांच्या घरावर छापा टाकला. छापा टाकला त्यावेळी तिच्या घरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले. गुरुवारी एनसीबी ने अतिथीगृहातही अबिगैल व सनम या दोघांचीही चौकशी केली आहे.

टीव्हीच्या लोकप्रिय जोडप्यांमध्येअबिगैल पांडे आणि सनम जौहर यांचा समावेश आहे आणि उत्कृष्ट नर्तक देखील आहेत. त्यांनी बरेच टीव्ही शो एकत्र केले आहेत.

आतापर्यंत दीपिका पादुकोण, सारा अली खान, रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंह यांच्यासह ड्रग्स प्रकरणात बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.