Drumstick Controls Blood Pressure | शेवगा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होतो, पोटासह ‘या’ गोष्टींसाठीही फायदेशीर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Drumstick Controls Blood Pressure | शेवगा (Drumstick) या भाजीच्या खोडाचा (Trunk), बियांचा (Seeds), पानांचा (Leaves) आणि शेंगांचा खुप उपयोग आणि औषधी फायदे (Medicinal Benefits) आहेत. शेवग्यामध्ये पोटॅशियम (Potassium), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि इतर अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे (Vitamins) असतात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित (Drumstick Controls Blood Pressure) होतो आणि पोटाच्या तक्रारीही कमी होतात.

 

जाणून घेऊया शेवगा सेवन करण्याचे फायदे (Benefits Of Drumstick) !
आतापर्यंत आपल्याला शेवग्याच्या शेंगा आणि बियांबद्दलच माहीत असेल. परंतु त्याची पानांचाही खुप फायदा (Drumstick Controls Blood Pressure) आहे. पानांमध्ये असलेल्या पोषक घटकामुळे शरीराचे वजन कमी करण्यासाठी मदत होते. भाज्या, मसूर, सांभार आदींमध्ये चव आणि सुगंध वाढविण्यासाठी आपण शेवग्याच्या पानांचा वापर करतो.

 

शेवग्याची पाने जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स (Antioxidants), बायोएक्टिव्ह संयुगे (Bioactive Compound) आदी घटकांनी भरलेली असतात. यात फायटेट्स (Phytate) देखील असतात, जे अँटी-न्यूट्रिएंट्सचा (Anti-nutrients) एक प्रकार आहेत. यासह या पानांमध्ये प्रथिने (Protein), व्हिटॅमिन बी ६ (Vitamin B6), व्हिटॅमिन सी, लोह (Iron), राइबोफ्लेविन (Riboflavin), मॅग्नेशियम (Magnesium) इत्यादी देखील असतात.

 

शेवग्याच्या पानांमुळे रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) कमी होते. अँटीऑक्सिडंट्स असलेल्या शेवग्याच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetics) ही पाने खुप गुणकारी मानली जातात.

तसेच, ही हिरवी पाने रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवून फ्लू (Flu), सर्दी (Cold), खोकला (Cough) इत्यादींपासून संरक्षण करतात. तुम्ही त्याची पाने वाळवून पावडर तयार करा. शेवगाच्या पानांपासून तयार केलेली पावडर १ टी स्पून घेऊन एक कप पाण्यात उकळवा. त्यात थोडं मध (Honey) घाला. मग या हर्बल टीचे (Herbal Tea) सेवन करा.

 

पोट आणि आतडे निरोगी राहते (Healthy Stomach And Intestine) –
काहीही उलटेसुलटे खाण्यात आल्याने पोटदुखी, सूज येणे, गॅस यासारख्या समस्या निर्माण होतात.
पोटाच्या या समस्यांवर (Stomach Problems) मात करण्यासाठी शेवग्याच्या पानांपासून बनवलेल्या चहाचं सेवन करावं.
बद्धकोष्ठता (Constipation), पोटात होणारा वायू, वेदना, सूज यांचा त्रासात आराम मिळेल.
या पानांमध्ये असलेले प्रतिजैविक (Antibiotic), अँटीबॅक्टेरियल गुणधर्म (Antibacterial Properties) विषाणूच्या प्रादुर्भावापासून जिवाणूंचे संरक्षण करतात.
यामुळे पाचनसंस्थाही मजबूत होते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Drumstick Controls Blood Pressure | eating drumstick controls blood pressure and it is beneficial for these things including stomach

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

 

Chandan Benefits | चेहर्‍यावर अशाप्रकारे लावा चंदन, दूर होतील ‘या’ 4 समस्या; जाणून घ्या

 

Blood Sugar | डायबिटीजच्या रुग्णांची जेवल्यानंतर आणि अगोदर किती असावी ‘ब्लड शुगर लेव्हल’, जाणून घ्या

 

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास उपयोगी ठरू शकतात ‘ही’ होमिओपॅथी औषधे, घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या

 

IPS Saurabh Tripathi | गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडूनच खंडणीची मागणी?, DCP सौरभ त्रिपाठी फरार घोषीत, मुंबई पोलीस दलात खळबळ