नशेमध्ये ‘धुंद’ असलेली ‘एअर होस्टेस’ विमानातच झाली ‘आडवी’ अन् नोकरी ‘गमावली’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – एका फ्लाइटची एअरहोस्टेस दारूच्या नशेत धुंद होती त्यामुळे तिने प्रवाशांची मदत करण्याऐवजी प्रवाशांनाच तिची मदत करावी लागली आहे. ही एअरहोस्टेस दारूच्या नशेत असल्याने तिला हेही समजत नव्हते की विमान कोठे लँड होत आहे. अमेरिकेच्या युनाईटेड एक्सप्रेसच्या फ्लाइटमधील हा प्रकार आहे.

अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथे राहणारी ही एअरहोस्टेस असून ज्युलियान असे तिचे नाव आहे. तसंच ही ४९ वर्षांची आहे. तिने ठरलेल्या प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई करत निलंबित करून तिच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.

शिकागोहून इंडियानाच्या सकाळच्या विमानाने सेवा देणार होती. मात्र तेव्हा काही प्रवाशांच्या लक्षात आले की ती महिला सुरक्षिततेचा संदेश योग्य प्रकारे पोहोचवू शकत नाही तसंच ती योग्यरित्या चालतही नाही. चालताना ती अडखळत होती.

आमच्या फ्लाइट अटेंड मद्यधुंद झाल्याचे दिसत आहे. त्यांना व्यवस्थित उभे राहता येत नाही आणि ती प्रवाशांचे सामानही सोडत आहे, अशी तक्रार एका व्यक्तीने एअरलाइन्सला ट्विट करुन म्हटले. तसंच प्रवाशांसाठी एकच फ्लाइट अटेंडंट होता. तिचा सतत वाजत होता आणि तिला रिसीव्ह होत नव्हता, असंही एका प्रवाशाने सांगितले. दरम्यान, अटकेनंतर महिलेने फ्लाइटपूर्वी वोडका पिल्याची कबुली दिली. त्यामुळे आता तिच्यावर कारवाईलाही सुरुवात झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like