मद्यपी चालकाचा बसस्थानकात धिंगाणा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात एका बस चालकाने दारु पिऊन चांगलाच धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सुरेश पाठक (रा.वाघाडी, ता.शिरपुर) असे मद्यपी बस चालकाचे नाव आहे. हर्षल गोसावी यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, मध्यराञी दारु पिऊन विनोद पाठक हे धुळे मध्यवर्ती बस स्थानकात आले. त्यांनी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक हर्षल अशोक गोसावी यांचेशी वाद घालत मोठमोठ्याने आरडा ओरड केली. सार्वजनिक जागी शातंतेचा भंग केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाठक यांना ताब्यात घेतले. त्यानंतर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर दारु पिऊन धिंगाणा घातल्यामुळे पाठक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.