रात्री उशिरा रेल्वेत ‘संबंध’ ठेवणार्‍या जोडप्याच्या ‘झेंगाटा’चा व्हिडिओ झाला ‘लिक’, पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक कपल चालत्या रेल्वेत संबंध बनवताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले. ही रेल्वे स्कॉटलॅंडच्या ग्लासगो पासून एडिनबर्गला जात होती. स्कॉटरेलच्या प्रमुखांनी सांगितले की पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. स्कॉटरेल त्यांना तपासात सहयोग करेल.

एका रिपोर्टनुसार, हे कपल रात्री उशिरा रेल्वेमध्ये चढले, त्यावेळी रेल्वेत प्रवाशी कमी होते. सोशल मिडियावर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर या कपलच्या विरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर हा व्हिडिओ ऑनलाइन लिक झाला. स्कॉटरेलच्या प्रमुखांनी या प्रकरणी तपासानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

एका रेल्वे प्रवाशाने सांगितले की रेल्वेत रोमांस करणे अत्यंत हैराण करणारे आहे. हे तर स्पष्ट आहे की हे कपल नशेत होते यामुळे त्यांना याबाबतची शुद्ध नव्हती. एका प्रवाशाने संताप व्यक्त करत सांगितले की एखादे कुटूंब आपल्या मुलांसह या डब्यात चढले असते तर काय झाले असते. हे अत्यंत असभ्य वर्तन आहे.

दोन मिनिटाच्या या क्लिपमध्ये कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे. स्कॉटरेलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की या प्रकारच्या असभ्य वर्तनाला स्कॉटलँडच्या रेल्वेत जागा नाही आणि ब्रिटिश पोलिसांच्या सहाय्याने आम्ही या प्रकरणाचा तपास करु.

Visit  :Policenama.com