दोन वाहतूक पोलिसांची दारुड्याने केली धुलाई 

कर्नाटक : वृत्तसंस्था

कर्नाटकातील दवंगेरे या परिसरात आज दोन वाहतूक पोलिसांना एका व्यक्तीने बेदम मारहाण केली आहे. अक्षरश: पोलिसाला जमिनीवर लोळवून या व्यक्तीने पोलिसांची धुलाई केली आहे. पोलिसांवर हात उगारणारी व्यक्ती ही मद्यप्राशन केलेली असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दारुड्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. आरोपी रुद्रप्पा याला अटक करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fed4194d-cc90-11e8-947f-05f24f472f83′]

कर्नाटकची राजधानी बेंगलुरुमधील दवंगेरे परिसरात आज सकाळी वाहतूक शाखेचे दोन पोलीस अधिकारी कर्तव्य बजावत होते. त्यावेळी मद्यधुंद रुद्रप्पा दुचाकीवरुन विना हेल्मेट जात होता. पोलिसांनी त्याला आडवले असता त्याने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याला समजावून सांगत असताना तो पोलिसांच्या अंगावर धावून गेला. त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात जड वस्तू मारुन गंभीर जखमी केले. तर दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावर पाडून बेदम मारहाण केली.

या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मिडियावर व्हायरल केला. या व्हिडीओमध्ये आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करत असताना आरोपीने रस्त्याच्या कडेला असलेला दगड उचलून पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात घतला. यामध्ये कर्मचारी रक्तबंबाळ झाला आहे. यानंतर आरोपीने दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करत त्यांना देखील बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडीओत चित्रीत झाले आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03dd9f4e-cc91-11e8-ac25-a9f397558ba1′]

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेचे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल हे आपले कर्तव्य बजावत होते. त्यांनी विना हेल्मेट दुचाकी चारवणाऱ्या आरोपीला थांबवून हेल्मेट घालण्यास सांगत होते. त्यावेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घालुन मारपीट केली.