महोत्सवादरम्यान युवकाने भरचौकात पोलिसाला केलं ‘KISS’, पुढ झालं ‘असं’ काही

हैद्राबाद : वृत्तसंस्था – तेलंगनातील ‘बोनालु’ महोत्सवाच्या वेळी एक युवकाला पोलीस कर्मचाऱ्यासोबत अयोग्य वर्तन करणे चांगलेच महागात पडले आहे. पादचाऱ्याने महोत्सावादरम्यान तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची गळाभेट घेत त्याचे चुंबन घेतले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चुंबन घेणाऱ्या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुंबन घेणारा व्यक्ती एका खासगी बँकेत काम करतो.

तेलंगाना मधील विशेष उत्सवांपैकी बोनालु हा एक उत्सव आहे. या उत्सवात देवी महाकालीची पूजा केली जाते. बोनालु म्हणजेच प्रसाद, देवीने आपल्या पूर्ण केलेल्या इच्छेबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा उत्सव जुलै महिन्यामध्ये साजरा करण्यात येतो. तलंगनामध्ये बोनालु उत्सवामध्ये एका २८ वर्षीय युवकाने तेथून जाणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला आडवले. पोलीस कर्मचाऱ्याला काही समजण्याच्या आतच त्याने सर्वांसमोर पोलीस कर्मचाऱ्याचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी युवकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. रविवारी घडलेल्या या घटनेचा पोलिसांनी तपास केला असता चुंबन घेणारा युवक दारुच्या नशेत असल्याचे समोर आले. त्याने दारुच्या नशेत हे कृत्य केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक नाचताना दिसत आहेत. नाचणाऱ्या व्यक्तीपैंकी एक व्यक्ती अचानक तेथून जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा रस्ता आडवतो. त्याला काही समजण्याच्या आतच तो त्याचे चुंबन घेण्यास सुरुवात करतो.

पोलीस कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो व्यक्ती पोलिसांची मिठी सोडण्यास तयार नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे चिडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या कानशीलात लगावली. तरी देखील त्याने पोलीस कर्मचाऱ्याला सोडले नाही. अखेर या ठिकाणी असलेल्या इतर नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्याची त्या व्यक्तीपासून सुटका केली.