दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातच ‘त्या’ दारुड्या पोलिसाचा ‘धिंगाणा’

चंद्रपूर : पोलिसनामा ऑनलाईन – अनेकदा पोलीस कर्मचारी कायद्याचे रक्षण करण्याऐवजी दारू पिऊन धिंगाणा घालत तो कायदा मोडत असतात. अनेकदा दारू पिऊन राडे घालणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपण पहिले असतील. मात्र चक्क दारूबंदी असलेल्या चंद्र्पुर जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्याने दारू पिऊन भर चौकात धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मद्यधुंद पोलिस शिपायाचा भर चौकात धिंगाणा

वर्ध्यातील आष्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या पोलीस शिपायाने हा पराक्रम केला असून संदीप खंडारे असे त्याचे नाव आहे. दारू पिऊन भर चौकात त्याने नागरिकांशी हुज्जत घातली. वर्धा जिल्ह्यात सध्या दारूबंदी असून सगळीकडे अवैधरित्या दारू विक्री होताना दिसून येत आहे. पोलिसांनी यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसच दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याने नागरिकांनी याची तक्रार कुणाकडे करावी असा प्रश्न पडला आहे. या कर्मचाऱ्याने नागरिकांशी हुज्जत घालताना कुणालाही जुमानले नाही. यावेळी तो पूर्ण नशेमध्ये होता. त्याला कोणत्याही प्रकारची शुद्ध नव्हती.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु असून पुढील तपास देखील चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –