दारुच्या नशेत पकडली पोलिसांची कॉलर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन-भर रस्त्यावर दारुच्या नशेत अश्‍लिल चाळे करत असलेल्या इसमाला पोलिसांनी थेरगाव पोलीस चैकीत नेले असता. तेथे त्याने स्वतःचेच कपडे फाडत भिंतीवर डोके आपटले. यावरच तो शांत राहीला नाही तर त्याने नशेत थेट पोलिसाचीच कॉलर पकडली. हा प्रकार रविवारी (दि.९) रात्री नऊच्या सुमारास घडला.

अतुल विजयकुमार गाडवे (वय-३६ रा.थेरगाव, मुळ – सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस नाईक अभिजीत बाळू यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना थेरगाव गावठाण परिसरात एक व्यक्ती वेंगसकर स्टेडीयमजवळ चार चाकीमध्ये (एमएच १२ पीक्‍यू ०७७४) मध्ये एका अज्ञात महिलेबरोबर अश्‍लिल चाळे करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली.

यावेळी त्याने दारुच्या नशेत पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांनी त्याला थेरगाव पोलीस चौकीत आणले असता तेथेही त्याने पोलिसांनाच तुम्ही महिलांना छेडता काय असे म्हणत पोलीस नाईक अभिजीत बाळू यांची वर्दीची कॉलर पकडली. तसेच माझ्यावर मारहाण व खूनाचा गुन्हा दाखल आहे माझे कोणीच काही बिघडवू शकत नाही तुम्ही काय करणार म्हणत अंगावरचे कपडे फाडले व भिंतीवर डोके आपटून घेण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण व सरकारी कामाता अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.