अरे देवा ! दारूड्यानं ‘वाईन’वर घरच्यांसाठी मागितली ‘सबसिडी’, पोस्टर झालं ‘गावभर’ अन् ‘बोंबाबोंब’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था –  कानपूरमध्ये एका दारु पिणाऱ्यांने दारुच्या किंमती वाढवल्याने लावलेल्या पोस्टरची चर्चा रंगली आहे. पोस्टरमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत आणि पोस्टर द्वारे दारुची मागणी करण्यात आली आहे. त्यात म्हणण्यात आले आहे की, सरकारने दारुच्या किंमती वाढल्या आहेत आणि वाढलेल्या किंमतीतून त्यांच्या आईला आणि पत्नीला सरकारने सब्सिडी द्यावी.

दारुवर सब्सिडी मिळावी यासाठी मागणी –
आपल्या या आनोख्या मागणीने दारु पिणाऱ्या संजय शर्मा यांचे नाव कानपूरमध्ये चांगलेच गाजले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, 100 रुपयांना मिळणारी क्वार्टर (250 एमएल) आता 200 रुपयांना झाली आहे, त्यामुळे आता दारुच्या किंमतीत जी 100 रुपयांनी वाढ केली ती दारु पिणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला किंवा आईला सब्सिडी म्हणून देण्यात यावी.

दारुसाठी बॅनरबाजी –
दारुची किंमती वाढल्याने स्वत: दारुच्या नशेत असलेले संजय शर्मा पोस्टर लावून आंदोलन करत आहेत. त्यांनी सांगितले की ते रोज दोन क्वार्टर दारु पितात. एक बॅटल दारु देत त्याच दुकानात पितात आणि एक घरी घेऊन येतात.

रोज दारु पिणाऱ्या या संजय शर्मा यांची मागणी भले की सरकार मान्य करणार नाही, परंतू कुटूंबियांना नक्कीच आनंद होईल की दारु पिणाऱ्या शर्मा यांनी ते पित असलेल्या दारुची सब्सिडी कुटूंबाला मिळावी अशी मागणी केली.

दारु मिळे देशात अनेक घरात रोज हिंसेच्या अनेक घटना घडतात. अनेकदा दारु पिण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून पत्नी आणि मुलांना मारहाण केली जाते. अशा आता या पोस्टरची चर्चा रंगली आहे.