तळीरामांसाठी खुशखबर : राज्यात ‘Dry Day’ ची संख्या कमी होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मद्यपींसाठी सरकारने एक खुशखबर आणली आहे. आता राज्यातील ‘ड्राय डे’ म्हणजे दारू विक्री बंद असण्याचे दिवस कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. सध्या राज्यात सणानुसार प्रत्येक शहरात ड्राय डे जाहीर करण्यात येतो. समितीचा अहवाल आल्यानंतर सगळीकडे एकाच धोरण लागू करण्यात येणार असल्याची अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

सध्या ‘ड्राय डे’ कोणत्या दिवशी असावा याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. कोणत्या जिल्ह्यात सण साजरा होणार त्यांच्यानुसार जिल्हाधिकारी ते निर्णय घेत असतात. मात्र काही ठिकाणी ड्राय डेच्या नावाखाली गरज नसतानाही मद्याची दुकाने बंद केली जातात. त्यामुळे या सगळ्यात एकसूत्रता यावी म्हणून या समितीची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांना याचे अधिकार देण्याऐवजी संपूर्ण राज्यात एकच धोरण राबवण्याविषयी विचार सुरु असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी पहिल्यांदाच नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी ते नागपूर विमानतळावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला.

Loading...
You might also like