डोळ्यांचा कोरडेपणा म्हणजे काय ? काय आहेत याची ‘कारणं’, ‘लक्षणं’ अन् ‘उपाय’

डोळ्यांचा कोरडेपणा म्हणजे काय ?

डोळ्यांचा कोरडेपणा ही एक सामान्य बाब आहे. यात एखाद्याला डोळ्यात कोरडेपणा किंवा जळजळीच्या स्वरूपात अस्वस्थता जाणवते. कारण पुरेसे अश्रू तयार होत नाहीत.

काय आहेत याची लक्षणं ?

– कोरडेपणा
– सूज
– खाजवणे
– जळजळ होणं
– लालसरपणा
– अस्पष्ट दृष्टीक्षेप ज्यात पापण्या फडफडल्यानंतर सुधारणा होते.
– वेदना
– डोळ्यात पाणी येणं
– डोळ्याच्या माग प्रेशर जाणवणं

काय आहेत याची कारणं ?

– कॉन्टॅक्ट लेंसचा वापर
– गरम हवामान
– वादळी वातावरण
– पापाणीत सूज
– अँटीहिस्टामाईन्स, अँटीडिप्रेसंट्स, गर्भनिरोधक गोळ्या आणि डाययुरेटीक्स सारखी औषधं
– मेनोपॉज आणि गर्भधारणा अशा स्थितीत हार्मोनल बदल
– वयस्कर माणसात याची शक्यता जास्त असते.
– पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा सिंड्रोम अधिक दिसून येतो.

काय आहेत यावरील उपचार ?

– आयड्रॉप्स
– डोळे स्निग्ध करण्यासाठी ऑईंटमेंट
– सूज कमी करण्यासाठी औषधं
– डोळे स्निग्ध ठेवण्यासाठी डॉक्टर ओमेगा 3 फॅटी अॅसिड्सची आहारात शिफारस करू शकतात.