दिवाळीनंतर तेजीने घसरतील काजू-बदाम आणि मनुक्याचे दर, जाणून घ्या का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या 6 महिन्यांपासून लॉकडाउनमुळे मेवा बाजारामध्ये शांतता पसरली आहे. जानेवारी – फेब्रुवारी 2020 पर्यंत स्टोअर – गोदामांमध्ये भरलेला माल तसाच राहिला आहे. व्यापाराच्या म्हणण्यानुसार, यंदा 50 टक्के पेक्षा जास्त मेवा विकला गेला नाही. आता आशा फक्त हॉटेल-रेस्टॉरंट आणि लग्नावर अवलंबून आहे. या अशा जागा आहेत जिथे काजू भरपूर प्रमाणात विकले जातात. पण नजर सरकारवर टिकून आहे.

या निर्णयाकडे व्यापारांची नजर- दिल्लीच्या खारी बाओलीचे घाऊक फळ व्यापारी राजीव बत्रा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, कोरोना आणि लॉकडाउनमुळे बाजार बंद होता. ही परिस्थिती नसती तर कमीतकमी 50 टक्के वस्तू विकल्या गेल्या असत्या. पण अशा परिस्थितीत ना लग्न झालं, ना हॉटेल-रेस्टॉरंट उघडले, ना कुठल्याही उत्सवाला बाजाराचा लाभ मिळाला. आता थोडीशी आशा दिवाळीनंतर येणाऱ्या सणांवर आणि हॉटेल-रेस्टॉरंट्सवर टिकून आहे. पण इथेही सरकारची नजर वाकडी आहे.

लग्नासाठी दिल्लीत 100 आणि यूपीमध्ये 200 ची परवानगी आहेत. जोपर्यंत लग्नामध्ये एक हजार लोक येणार नाहीत, तोपर्यंत जेवण कसे तयार केले जाईल आणि किती मेवा वापरला जाईल. त्याचबरोबर, लोक हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये येत नाहीत. हॉटेल-रेस्टॉरंट्समध्ये केवळ 20 टक्के वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.

नूरी मसाल्याचे घाऊक – किरकोळ व्यवसायाचे संचालक मोहम्मद आजम यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, सरकारने लग्नामध्ये पाहुण्यांना येण्याची परवानगी द्यावी. त्याच वेळी, हॉटेल-रेस्टॉरंट पूर्णपणे सामान्यपणे चालू ठेवण्यास परवानगी द्यावी. जर तसे झाले नाही तर दुकाने आणि गोदामामध्ये अजूनही पूर्वीचा माल भरला आहे तो तसाच राहिल. नवीन वस्तूंची आवक सुरू झाली आहे. नवीन वस्तूंची विक्री झाली नाही तर व्यापारी दर कमी करेल. त्याचबरोबर, जुन्या वस्तूंचा दर कमी करुन विकण्यास व्यापारी मजबूर होतील. यासाठी दिवाळीनंतर मेवाचा रेट कोणताही रेकॉर्ड करू शकतो.

स्वस्त काजू आणि पिस्तांचा – 15 दिवसांपूर्वी आणि आताचा दर –

1) अमेरिकन बदाम 900 ते 660 रुपये प्रति किलोवर आले होते. आता 540 ते 580 रुपये किलो विकले जात आहे.

(2) काजू 1100 ते 950 रुपये प्रति किलोवर आले होते. आता 660 ते 710 रुपये विकले जात आहेत.

(3) मनुका 400 ते 350 रुपये प्रति किलोमध्ये आला होता. आता 225 ते 250 रूपये विकले जात आहेत.

10 दिवसांपूर्वी, पिस्ता 1400 रुपये किलो दराने थेट 1100 रुपये किलोवर आला होता. मात्र, दहा दिवसानंतरही पिस्ताच्या दरात फारसा फरक झालेला नाही. पिस्तामध्ये 100 ते 150 रुपयांचा फरक बाजारात पाहायला मिळत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, पिस्ताच्या नवीन पिकाविषयी अचूक माहिती बाजारात नाही. त्याचबरोबर अक्रोड बाजारात 800 ते 850 रुपयांनी विकले जात आहे. हिवाळ्याच्या काळात अक्रोडची सर्वाधिक मागणी असते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like