कोरड्या केसांसाठी 4 सोपे घरगुती उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  फास्ट फूडचं सेवन, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळं केसांच्या कोरडेपणाची समस्या उद्भवू शकते. अनेकजण यावर विविध उपाय करत असतात. कधी कधी याचे दुष्परिणामही होत असतात. आज आपण यावर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) गरम तेल – यासाठी दोन चमचे बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल आणि 2 चमचे खोबरेल तेल एकत्र करून घ्या. हे तेल गरम करा. नंतर या तेलानं मसाज करा आणि नंतर केस टॉवेलनं बांधून ठेवा. काही वेळानं केस साध्या पाण्यानं धुवून घ्या.

2) अंड्याचा बलक आणि पाणी – यासाठी तुम्हाला अंड्याचे 2 बलक लागतील. हे बलक वाटीत घेऊन त्यात 3 चमचे पाणी घ्या. हे मिश्रण योग्य पद्धतीनं एकत्र करा. हे मिश्रण 30 मिनिटांसाठी केसांना लावा. यानंतर केस साध्या पाण्यानं धुवून घ्या.

3) अंडी, दही आणि मधाचं मिश्रण – 2 अंडी, 1 चमचा मध आणि 2 चमचे दही घ्या. आधी अंडी फोडून घ्या, नंतर त्यात मध आणि दही घाला. त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट 30 मिनिटांसाठी केसांना लावा. नंतर केस साध्या पाण्यानं धुवून घ्या.

4) मध आणि व्हेजिटेबल ऑईल – दोन चमचे मध आणि दोन चमचे व्हेजिटेबल ऑईल एकत्र करा. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्याला लावा. यानंतर साध्या पाण्यानं केस धुवून घ्या. तुम्ही केस धुताना शॅम्पूचा वापर करू शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.