Dryness In Mouth And Throat At Night | सकाळी झोपेतून उठतानाच तोंडाला-घशाला खूप कोरड पडतेय?; ‘हे’ पाहा 5 कारणे, काळजी घ्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Dryness In Mouth And Throat At Night | सध्या उन्हाचा तडाखा लागला आहे. वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे माणसाला थंड पेयजल अधिक प्रमाणात लागतं. दरम्यान रात्री जरी पाणी पिऊन झोपला असाल तर अनेकदा सकाळी उठल्यानंतर तोंड कोरडं-कोरडं पडल्यासारखं वाटतं. त्यावेळी तहान लागली असते, पाणी प्यावेसे वाटते. घसा कोरडा वाटू लागतो (Dryness In Mouth And Throat At Night). तेव्हा कधी घटाघटा पाणी पितो असं होतं. मात्र असे काही लक्षणे होत असेल तर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे (Healthy Living). कारण पाणी कमी पिण्यानेही अशा समस्या जाणवू लागतात. उव्हाळ्यात तोंड कोरडं पडणे असं होत असेल तर याकडे लक्ष देणे गरजेचे (Health Tips) आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. (Mouth And Throat Dryness)

 

तोंड फार कोरडं पडतंय का? (Is The Mouth Very Dry?) –
सकाळी उठतानाच घसा, तोंड, ओठ फार कोरडे पडत असतील तर त्याची ५ कारणं ढोबळमानानं दिसतात. ढोबळमानानं यासाठी की जनरल सामान्य प्रकृती असलेल्या व्यक्तींसंदर्भात ही कारणं दिसतात. ज्यांची तब्येत बिघडलेली आहे, काही आजार आहे त्यांच्यासंदर्भात ही कारणं वेगळीही असू शकतात. (Dryness In Mouth And Throat At Night)

 

औषध कोणती आणि कधी घेताय? (What Medicine And When To Take It?) –
अगदी साधी ॲसिडिटी, डोकेदुखी, पाठ किंवा गुडघेदुखी किंवा सर्दीची औषधं तुम्ही रात्री घेत असाल आणि वेळा न पाळता कधीही घेत असाल तरीही घशाला, तोंडाला अशी कोरड पडू शकते. त्यामुळे एकतर डॉक्टरांना सांगा की मला असा त्रास होतोय, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे करा. दुसरं म्हणजे औषधं रात्री फार उशीरा घेऊ नका. शक्य तेवढ्या लवकर, रात्री ८ पर्यंत घ्या. आणि रोज तीच वेळ सांभाळा.

तोंडाने श्वास घेताय, घोरताय का? (Breathing Through The Mouth, Snoring?) –
अनेकजण हे मान्यच करत नाहीत की आपण घोरतो (Snoring). मात्र त्यामुळे ही घसा कोरडा पडतो. मुख्य म्हणजे अनेकजण तोंडाने श्वास घेतात. त्यानंही घसा कोरडा पडतो, त्यावरही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

 

स्मोकिंग, दारू पिणे किंवा पॅसिव्ह स्मोकिंग (Smoking, Drinking Or Passive Smoking) –
व्यसनी लोकांना हा त्रास होतोच. मात्र सिगारेट सतत कुणी पीत असेल आणि दिवसभर त्यांच्या संपर्कात राहून पॅसिव्ह स्मोकिंग होत असेल तर तुम्हालाही श्वसनाचे त्रास, घसा कोरडा पडणे असे त्रास होऊ शकतात.

 

डिहायड्रेशन (Dehydration) –
हे कारण उन्हाळ्याशी संबंधित आहेच. अनेकजण पाणीच कमी पितात. उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाणी कमी होण्याचा त्रास वाढतो. दिवसा लक्षात येत नाही, रात्री मात्र हा त्रास वाढून पायात गोळे येणे ते घसा-तोंड काेरडं पडणं असा त्रास होतो.

डायबिटिस आहे? (Have Diabetes) –
तुम्हाला नसेलही डायबिटिस पण तरी शूगर वाढली (Sugar Level) आहे का? एकदा चाचणी करून घ्या.
तीन महिन्यांची साखर तपासा, त्यातून कदाचित शुगरचा वाढता त्रास आणि घशाला कोरड याचं काही संबंध लागू शकेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Dryness In Mouth And Throat At Night | dryness in mouth in summer 5 reasons symptoms and how to take care

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mango Seeds Health Benefits | चुकूनही फेकू नका आंब्याचे बाटे, Cholesterol सारखे 5 गंभीर आजार होतील दूर; जाणून घ्या कसा करावा वापर

 

Summer Foods For Diabetes | उन्हाळ्यात 5 ड्रिंक्स, 5 भाज्या आणि 5 फळांचे डायबिटीज रुग्णांनी करावे सेवन; संपूर्ण सीझनमध्ये वाढणार नाही Blood Sugar

 

Soaked Fig Benefits | रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्यापोटी खा अंजीर, शरीरात वाढेल आयर्न-कॅल्शियम, 5 आजार होतील दूर