DS Kulkarni Builder | पुण्यातील 4 बिल्डर्सनी 16000 कोटींच्या माझ्या मालमत्ता अवघ्या 826 कोटी रुपयांना हडपल्या : डी. एस. कुलकर्णी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – DS Kulkarni Builder | बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांवर गंभीर आरोप केले आहेत. कुलकर्णी यांनी म्हटले की, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड (DSK Developers Ltd) ही कंपनी पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या असून ते ठेवीदारांचे पैसे परत करण्यास तयार नाहीत.

डी. एस. कुलकर्णी यांनी गंभीर आरोप करताना पुढे म्हटले की, १६ हजार कोटींच्या माझ्या मालमत्ता अवघ्या ८२६ कोटी रुपयांना विकत घेतल्या आहेत. व्ही. टी. पारलेशा, जयंत शहा, अशोक चोरडीया आणि प्रमोद रांका यांनी एनसीएलटीमार्फत या मालमत्ता विकत घेतल्या आहेत.

या गंभीर प्रकाराविरोधात डीएसके सुप्रीम कोर्टात गेले आहेत. सुप्रीम कोर्टाने १० मेपर्यंत या मालमत्ता विकण्यास स्थिगिती दिली आहे, असे डीएसके यांनी म्हटले.

डी. एस. कुलकर्णी यांनी म्हटले की, सध्या अंगावरील कपडे सोडता माझ्याकडे काहीच नाही.
मालमत्ता तसेच बँक खाती गोठवली आहेत. मी ठेवीदारांचे पैसे परत कसे देऊ. २०१७ मध्ये एकाच वेळी ३२ हजार
जणांनी माझ्याकडे पैसे मागितले. मी आयुष्यात कधीही खोटे बोललो नाही. माझ्या जमिनी हडप केल्या आहेत.

डी. एस. कुलकर्णी म्हणाले, मी दिवाळखोर नाही. मला गुंतवणुकदारांचे पैसे परत द्यायचेत.
आणखी एक महिन्याचा कालावधी दिला असता, तर सर्व मुद्दे निकाली लागले असते. मी पैसे देत होतो. पैसे कमी पडत नव्हते.
पण, मला अटक होण्याआधी सर्व बँक खाती गोठवली. माझ्याविरोधात सर्व ठरवून केले गेले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास तुमचे राजकीय करिअर धोक्यात येईल का? अजित पवार म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ गुरुवारी भरणार अर्ज ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, जंगी रॅली, भव्य सभा घेणार