‘जय महाराष्ट्र’ म्हणत DSK च्या गुंतवणुकदाराची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डी. एस. कुलकर्णी याच्या कंपनीत गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याने एका ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. तानाजी गणपत कोरके (वय ६१, रा. भीमनगर, आंबेडकर हायस्कुलसमोर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, तानाजी कोरके यांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत ४ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. त्याची मुदत २०१७ मध्ये संपली. मात्र, त्याचे व्याज आणि मुद्दल त्यांना परत मिळाले नाही. त्यामुळे मुलीचे लग्न करु शकत नसल्याची खंत त्यांना होती. त्यातून त्यांनी काल रात्री सर्व जण झोपल्यावर दोरीने घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घरातील लोक उठले असताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

घोरपडी पोलीस चौकीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली दिसून आली. ‘मृत्यूनंतर आत्महत्येस डीएस कुलकर्णी यांना जबाबदार धरून पोलीसांनी किमान माझ्या कुटुंबियांना तरी पैसे मिळवून द्यावेत. माझ्या आत्महत्येनंतर तरी हे पैसे मिळून माझ्या मुलीचे लग्न करतील तेव्हा माझ्या आत्म्यास शांती लाभेल.’ अशी विनंती या पत्रात लिहिली आहे.  पत्रात शेवटी त्यांनी आपल्या नावापुढे ‘पुण्यातील सुरुवातीपासूनचा शिवसैनिक.. जय महाराष्ट्र !’ असा उल्लेख करत पत्राचा शेवट केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like