DSK Scam | डीएसके प्रकरणात 1000 पानांचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट सादर

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  DSK Scam | गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळलेला बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांनी ठेवीदारांची फसवणूक (DSK Scam) केल्या प्रकरणातील फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट (Forensic audit report) अखेर येथील विशेष न्यायाधीश जयंत राजे (Special Judge Jayant Raje) यांच्या न्यायालयात पोलिसांनी सादर केला आहे. सुमारे एक हजार पानांच्या या रिपोर्टमध्ये डीएसके यांनी केलेले सुमारे 15 वर्षांचा लेखाजोका मांडण्यात आला आहे.

डीएसके यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियांच्या (RBI) नियामांचे उल्लंघन केले असेल तर ते नमके कसे केले. याशिवाय हा एकूण आर्थिक गैरव्यवहार नेमका कसा झाला यांची माहिती त्यात नमूद करण्यात
आली आहे. रिपोर्ट बनविण्यासाठी दोन डिसेंबर 2017 रोजी मुंबईतील डी. जी. ठक्कर ऍण्ड असोसिएटसची नियुक्ती करण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या तपासाच्या तांत्रिक पुराव्याच्या अनुषंगाने ऑडिट करण्याचे काम या त्यांना देण्यात आले आहे. रिपोर्ट सादर न झाल्याने बचाव पक्षाकडून त्याबाबत मागणी करण्यात आली होती.
त्यामुळे तत्कालीन न्यायाधीशांनी पोलिसांनी निर्देश दिले होते की,
एका महिन्यात रिपोर्ट न्यायालयात दाखल करावा.
त्यावर तपास अधिका-यांनी 11 मार्च 2019 रोजी एका महिन्यात अंतरिम रिपोर्ट देवू,
असे न्यायालयास सांगितले होते. मात्र अद्यापही तो सादर करण्याबाबतचा आलेले नव्हता.

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस किंवा वकील तज्ज्ञ असतातच असे नाही. त्यामुळे अशा गुन्ह्यांची कुंडली काढण्यासाठी सरकारी मान्यता असलेल्या सीए फर्मची नियुक्ती केली जाते.
ही फर्म निष्पक्षपणे गुन्ह्यातील कंपनीचे ऑडिट करते.
ठेवीदारांची फसवणूक कशी झाली हे त्याआधारे समजते.
फसवणूक झाल्याचे या रिपोर्टच्या निष्कर्षांतून स्पष्ट झाले तर गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो.

 

Web Title : DSK Scam | Presented 1000 page forensic audit report in DSK case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | विनापरवानगी बाजीराव पेशवेंची मिरवणूक ! ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांसह 25 जणांविरूध्द गुन्हा

Burglary in Pune | फिरायला गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 90 लाखांचा ऐवज लंपास

Beauty Drinks | दररोज ‘हे’ ब्यूटी ड्रिंक्स प्या, चेहरा नैसर्गिकरित्या चमकेल; जाणून घ्या