DSK च्या ‘या’ 13 अलिशान गाड्यांचा 15 फेब्रुवारीला जाहीर ‘लिलाव’, ‘इथं’ पाहा वाहनांची यादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठेविदारांच्या कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकणी सध्या अटकेत असलेल्या बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव 15 फेब्रुवारीला होणार आहे. मावळ प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी गाड्यांच्या लिलावाची तारीख जाहीर केली आहे. या तेरा गाड्यांची एकूण किंमत 2 कोटी 86 लाख 96 हजार 559 ऐवढी निश्चित करण्यात आली असून, या संदर्भात जाहीर नोटीस देण्यात येणार आहे.

जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यास नुकतेच न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला परवानगी दिली. डीएसके यांच्याकडे एकूण 20 वाहने असून त्यापैकी 13 गाड्यांचा लिलाव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार संदेश शिर्के यांनी हे लिलाव जाहीर केले आहेत. या गाड्यांमध्ये बीएमडब्यू, पोर्शे, टोयटा अशा अलिशान गाड्यांचा समावेश आहे.

लिलाव होणाऱ्या गाड्या व त्यांच्या किंमती कंसात
1. पोर्शे ( 78 लाख 10 हजार)
2. बीएमडब्ल्यू (85 लाख 70 हजार)
3. ऑगस्टा (26लाख 64 हजार 559)
4. बीएमडब्ल्यू (41 लाख)
5. कॅमरी हायब्रीड (16 लाख 87 हजार)
6. स्नॅट्रो (1 लाख 20 हजार)
7. क्लॉलिस (2 लाख 50 हजार)
8. ईटिओस् (4 लाख 30 हजार)
9. इनोव्हा ( 8 लाख 47 हजार)
10. इनोव्हा (4 लाख 50 हजार)
11. इनोव्हा (8 लाख 50 हजार)
12. इनोव्हा (6 लाख 50 हजार)
13 इनोव्हा (3 लाख)

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये वाहनांचा समावेश असून, गेल्या अनेक महिन्यांपासून ही महागडी वाहने एकाच ठिकाणी धूळ खात पडून आहे. त्यामुळे ती खराब होऊन त्यांची किंमत कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने या वाहनांचा लिलाव करण्यास परवानगी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like