डीएसकेंच्या जप्त आलिशान गाड्यांचा होणार लिलाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी.एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यांच्या १६ अलिशान मोटारी व स्पोटर्स बाईक जप्त करण्यात आल्या होत्या. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने अर्ज करण्यात आला आहे.

डी.एस. कुलकर्णी यांच्या कडील जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पोर्श, बीएमडब्लू आणि एमव्ही ऑगस्टा सुपरबाईक अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या जप्त करुन सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत.

डी.एस.कुलकर्णी यांच्या मालमत्तेबरोबरच त्यांच्या अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्या डी.एस. कुलकर्णी यांच्याच मालकीच्या असून त्यांच्यावर कोणाचा क्लेम नसल्याने त्यांचा लिलाव लवकरात लवकर करण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज जिल्हा प्रशासानाने न्यायालयात केला आहे.

संबंधित घडामोडी:

डीएसके विश्वमधील मालमत्तेचा लिलाव

डीएसके प्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या ‘त्या’ तीन अधिकार्‍यांची चौकशी होणार 

डीएसके यांचे पुत्र शिरीष कुलकर्णींचा अंतरिम जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

डीएसके, टेम्पल रोज, भगतानी बिल्डर्सविरोधात तक्रारी द्या

सांगलीतही डीएसकेंसह दोन मुलांवर गुन्हा दाखल