डिएसकेंची नार्को टेस्ट करा ; ठेवीदारांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डि. एस. कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे. डिसके यांनी आमचा पैसा इतरत्र वळवून आमची फसवणूक केली आहे. त्यांनी न्यायालयाचीही वेळोवेळी दिशाभूल केली आहे. त्यामुळे पैशांचा विनियोग त्यांनी कसा केला. याचा तपास करण्यात यावा त्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी ठेवीदारांनी न्यायालयाकडे केली आहे.

डिएसके यांचे सर्व प्रकल्प रखडलेले आहेत. ते म्हाडाकडे दिले तर १५ महिन्यांत पुर्ण होऊ शकतात. असं डिएसके यांनी न्यायालयांत सांगितलं होतं. परंतु त्यांच्यावर बँकांचे कर्ज आहे. आता निधी उपलब्ध नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे प्रकल्प रखडलेले आहेत. निधी नसल्याने ते १५ महिन्यांत पुर्ण होऊ शकत नाहीत. असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी केला.

तर डिएसके नेहमीप्रमाणे खोटं बोलत आहेत. त्यांनी न्यायालयाची दिशाभूल केली असून निधी उपलब्ध नसल्याने कोणताही प्रकल्प पुर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.